"एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहिला नाही पाहिजे "....... आमदार समाधान दादा अवताडे


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) मंगळवेढा तालुक्यातील लोणार,हुन्नूर,मारोळी,शिरनांदगी,चिकलगी,निंबोणी,खवे आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपेमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून 

सर्वोतोपरी मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहिला नाही पाहिजे अशी काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आमदार समाधान दादा अवताडे यांनी सुचना केली.

       मुसळधार पाऊस होत आहे तरी शेतकऱ्यांनी शेतातील धोकादायक इमारती मध्ये वास्तव्य करुन नये.सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.असे आवाहन केले.मंगळवेढा तालुक्यातील लोणार या गावातील पांढरा कांदा प्रसिद्ध आहे.या कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आमदार समाधान दादा अवताडे यांनी केली.

    यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत उपस्थित असलेले मंगळवेढा तालुक्यातील तहसीलदार मदन जाधव कृषी अधिकारी मिसाळ मॅडम म्हैसाळ योजनेचे डेप्युटी इंजिनिअर गोसावी शाखा अभियंता श्री शिंदे भीमा पाटबंधारे विभागाचे इंजिनिअर जाधव शाखा अभियंता सरगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे साहेब सर्व सर्कल तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक लाईनमन उपस्थित होते. वरील गावांमधील शेतकरी व कार्यकर्ते प्रदीप खांडेकर ,शशिकांत चव्हाण ,तानाजी काकडे, अंबादास कुलकर्णी, नितीन पाटील, सुरेश ढोणे, गौडाप्पा बिराजदार, जगन्नाथ रेवे, ब्रह्मदेव रेवे,काका मिस्कर, मच्छिंद्र खताळ ,सचिन सोमूते ,गिरीश पाटील, यशवंत खताळ,शहाजी गायकवाड ,सुनील कांबळे, बिरू घोगरे, बसु बिराजदार ,भारत ढगे ,चंदू पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....