"महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कमिशन एजंट आणि व्यापारी बांधवानी शेतकऱ्यांना मदत करावी."
पंढरपूर ( प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.ज्या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे अशा जिल्ह्यामधून आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतामधील उभे पीक पाण्यामध्ये वाहून गेले आहे. सर्व जिल्ह्यांमधून त्या भागामधील राजकीय नेते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हे पूर बाधित लोकांच्या गावांमध्ये जाऊन त्यांना सहकार्य करीत आहे मदत करीत आहे. शासनाने 2000 कोटीच्या पुढील रकमेची मदत जाहीर केलेली आहे ठिकठिकाणी पिकांची नुकसानीचे पंचनामा केले जात आहे. शेतकरी कर्ज काढून आपल्या शेतामध्ये पीक लावतो. या पिकांना लागणारा खते औषधे बियाण्यांचा खर्च हे सर्व पाहता हे सर्व कर्ज काढूनच त्याला करावे लागते त्यात आसमानी संकटाने कहर केल्यामुळे करायला आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहिला नाही. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिसून येत आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या पिकावर तसेच भाजीपाल्यावर फळफळावर आधी शेतीमालावर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एजंट तसेच व्यापारी या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव ठरवून कमिशनच्या माध्यमातून असंख्य रुपये कमावतात या एजंटाचे तसेच व्यापाऱ्यांचे भले मोठे बंगले बांधलेले असतात अशा या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कमिशन एजंट व व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण पैसे कमवतो त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच अन्नधान्य देऊन मदत करण्याची भूमिका या कमिशन एजंट व व्यापाऱ्यांनी घ्यायला हवी. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आलेले हे अस्मानी संकट याची जाणीव ठेवून या शेतकऱ्यांना आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत करण्यात यावी असे सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना वाटत आहे. पाहूया कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे कमिशन एजंट आणि अन्नधान्याचे व्यापारी हे शेतकऱ्यांना किती मदत करतात ते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा