"पंढरपूर नगरपालिका कर भरणा केंद्र दोन, तीन ठिकाणी असावे" ... जनतेतून मागणी.


 पंढरपूर  ( प्रतिनिधी ) .. पंढरपूर नगरपालिकेने शहरभरातील सर्व मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्तेचा कर नगरपालिके कडे भरावेत म्हणून कर पावती घरपोच केली.आषाढी यात्रेच्या एकादशीच्या नंतर कर भरण्यासाठी लोक नगरपालिकेत गर्दी करत असतात.नगरपालिकेने कर विभागात फक्त दोन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण शहरांतील मालमत्ता धारकांचा कर भरण्याचे ओझे टाकले आहे.लोक ही गर्दी पाहून माघारी जात आहेत.नंतर कर भरु म्हणणाऱ्या ची संख्या ही वाढत आहे.कराचे पैसे खर्ची पडल्यानंतर ते कर भरणा करायचे विसरुन जातात त्यामुळे नगरपालिकांचे नुकसान होते.करा साठी तगादा लावावे लागतो.

    पंढरपूर नगरपालिकेने नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये कर संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना आप आपल्या भागामध्ये कर भरता येईल.शहरातील उपनगरे, तसेच प्रत्येक प्रभागात कर संकलन सुरू करावे.जेणे करून नगरपालिकेची आर्थिक वाढ होईल.कर भरणाऱ्या ग्राहकांची सोय होईल.वेळ व पैशाची बचत होईल.नगरपालिकेने विविध भागांमध्ये कर संकलन केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....