"दि. पंढरपूर मर्चंट को-ऑप .बँक पंढरपूर यांच्या वतीने वारकरी बांधवांना फराळ वाटप "
पंढरपूर ( प्रतिनिधी ) आषाढी यात्रेच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पायी चालत येणाऱ्या भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या दिवशी दि. पंढरपूर मर्चंट को-ऑप.बँक यांच्यावतीने आज रोजी वारकरी भावीक भक्तांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले.
दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी भावीक भक्तांना उपासाचे फराळ वाटप करण्यात येत असते. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेसमोर भाविक भक्तांना फराळाचे वाटप बँकेचे व्हाईस चेअरमन शिखरे माजी चेअरमन नागेश काका भोसले, माजी चेअरमन सोमनाथ काका डोंबे व संचालक अमरजीत पाटील, सुधीर भोसले, सुनील मोहिते, परदेशी, बँकेची सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने उपव्यवस्थापक कुलकर्णी साहेब,व व बँकेचे कर्मचारी यांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा