"कॅरिडाॅर बाबत मुख्यमंत्री काय बोलणार" पंढरपूर वासींयांचे लागले लक्ष.....
पंढरपूर ( प्रतिनिधी ) बहुचर्चित असलेले पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये कॅरिडाॅर होणार म्हणून गेली कित्येक महिन्यापासून पंढरपूर वासीया मध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे. उज्जैन व काशीच्या धरतीवर पंढरपूर शहरांमध्ये विकास कामे करण्याच्या उद्देशाने व भाविक भक्तांच्या सुख सोयी व सुविधा उपलब्ध देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन पंढरपूर या विठुरायाच्या तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांची मंदिर परिसरामध्ये अतिशय दाटीवाटी ची गर्दी होत असते. काही अघटित घटना घडू नये म्हणून व वारकरी बांधवांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून वारकरी भाविक भक्तांना सुलभतेने या मंदिर परिसरामध्ये चालता यावं आणि या भावी भक्तांना सुख सोयी सुविधा मंदिर परिसराच्या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन कॅरीडॉर हा उज्जैन, काशी या तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर ही योजना राबवणार आहेत. अशी चर्चा गेली कित्येक महिन्यांपासून पंढरपूर शहरांमध्ये सुरू आहे.
मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना यापूर्वी देखील डीपी प्लॅन, मास्टर प्लॅन या शासकीय योजने मध्ये या रहिवासी यांची घरे,दुकाने हे गेलेली आहेत.कित्येक कुटुंब हे रस्त्यावर आली आहेत.उदरनिर्वाहाचे साधन गेल्यामुळे या रहिवाशांना मानसिक, आर्थिक,संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील कित्येक रहिवाशांनी व दुकानदारांनी या कॅरिडाॅरला विरोध दर्शवलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने या कॅरीडोर बाधितांना नुकसान भरपाई व पर्यायी अन्यत्र जागा देण्याची आश्वासन दिलेले आहे तरी देखील या रहिवाशांची दुकानदारांची मानसिकता ही अजूनही अन्यत्र जाण्याची तयारी झालेली नाही. असंख्य अडचणींना व मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकार या कॅरीडोर योजनेला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. वारकरी भाविक भक्तांच्या सुख सोईसाठी व सुलभतेसाठी ही योजना राबवणार आहे. असे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
विठुरायाच्या या नगरीमध्ये कॅरीडोर आवश्यक आहे असे म्हणणाऱ्या भाविक भक्त तसेच स्थानिक रहिवाशांची संख्या देखील मोठी आहे. उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या पूजेनंतर ते कॅरिडॉर विषयी काय बोलणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचे तसेच पंढरपूर शहर जिल्हा आणि बाधित लोकांचे लक्ष वेधलेले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा