" वारकरी, शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे हक्काचे ठिकाण "पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती होय " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रभरातून तसेच देशभरामधून श्री विठुरायाच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी तसेच शेतकरी यांचे हक्काचे मुक्कामाचे ठिकाण म्हणजे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती होय. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी 5000 कोटी रुपये प्रमाणे पाच वर्षांमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोजी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात बोलत असताना त्यांनी दिली.

      कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी बांधवांचे पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासाठी व संशोधनासाठी महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व संशोधनामुळे शेतकरी बांधवांची जीवन सुखदायक होणार आहे. सौर ऊर्जा तसेच पाण्याचे योग्य नियोजन खते व बाजारपेठा या अद्यावत करून त्याचा लाभ शेतकरी बांधवांना होणार आहे.

    पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या या कृषी मेळ्यामध्ये फल उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले शेतीचे अवजारे ठिबक सिंचन सौर ऊर्जा तसेच शेतीला पूरक असलेले उद्योगधंद्यांची माहिती औषधे या शेतीविषयक असलेल्या गोष्टींची माहिती या कृषी महोत्सवांमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते. या पुढील काळामध्ये शेतकरी बांधवांना बारा तास विजेची उपलब्धता होणार आहे सौरऊर्जेच्या माध्यमातून ही व्यवस्था होणार आहे अशी देखील माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली 

  या कार्यक्रमास उपस्थित म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड , सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....