" कैलास उगले दांपत्याना विठूराया च्या पुजेचा मान मिळाला ".. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पुजेचा मान....
पंढरपूर ( प्रतिनिधी. ) यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत श्री विठुरायाच्या महापूजेचा मान जातेगाव येथील कैलास उगले त्या दांपत्यांना पूजेचा मान मिळाला.
सौ उगले दांपत्य हे गेली पंधरा वर्षापासून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत ते पंढरीच्या वारीला येत असतात. ते माळकरी आहेत. उगले दाम्पत्यांनी विठुरायाच्या महापूजेनंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले विठुरायाच्या महापूजेचा लाभ आम्हाला लाभला आम्हाला खूप आनंद झाला आहे.आम्ही आमच्या या भावना शब्दातून व्यक्त करू शकत नाही. आम्हाला कल्पना देखील नव्हती की आम्हाला महापूजेचा मान मिळेल म्हणून ,परंतु विठुरायाचा कृपेने विठुरायाच्या महापूजेचा लाभ आम्हाला मिळाला. असे कैलास उगले दाम्पत्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्नीसह आषाढी यात्रेच्या एकादशीच्या निमित्ताने शासकीय पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी व्हावा समाधानी व्हावा अशी मनोकामना विठुरायाच्या चरणी व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा