"लोक कार्याचा वसा घेतलेला आहे तो कसा असावा तर..... असा असावा." आमदार अभिजीत आबा पाटील यांची विधानभवनात जाण्याची धावपळ..
पंढरपूर ( प्रतिनिधी) विधानसभेचा आमदार होणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. आमदार होण्यासाठी अथक प्रयत्नाची पराकाष्ठा ,लोक हिताचे असंख्य कामे, आणि संघटन कौशल्य, लोकांचा मिळवलेला विश्वास , पक्षनिष्ठा, सर्वसामान्य जनता असो किंवा विरोधक असो त्यांनी केलेली टीका व बोलणी ही सहन करण्याची शक्ती, आणि कमी बोलणे व जास्तीत जास्त कामे करणे. या सर्व गोष्टीचा ताळमेळ करून लोक कार्य करणाऱी व्यक्ती असंख्य अडचणी मधून मार्ग काढीत ते बेभरवशाच्या या निवडणुकीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून जो उभा राहतो त्याच्या पदरी कधी पराजय असतो, तर कधी विजय असतो. अशीच विजयाची माळ घेऊन माढा विधानसभा मतदार संघामधून आपल्या कार्याच्या जोरावर विधानसभेला निवडून आलेले आमदार अभिजीत आबा पाटील हे सध्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित आहेत. या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये विविध ठिकाणांमधून महाराष्ट्र राज्यातील आमदार हे विधान भवनात येत असतात. मुंबईतील वाहतूक पाहिल्यानंतर या वाहतुकीच्या मधून वाट काढत हे लोकप्रतिनिधी विधानभवनाकडे पोहोचत असतात. वाटेमध्ये असंख्य ठिकाणी ट्रॅफिक जाम असते, सिग्नल्स असतात त्याचप्रमाणे या गर्दी मधून वाट काढत काढत हे लोकप्रतिनिधी विधानभवनात पोहोचतात. अशीच एक घटना अभिजीत आबा पाटील यांच्या या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये नुकतीच घडली. विधानभवनामध्ये पोहोचण्यासाठी उशीर होऊ लागल्यामुळे ते आपली गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलेली असताना ती गाडी तशीच तिथे सोडून त्यांनी मोटरसायकल स्वाराला विधानभावनापर्यंत सोडवण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन त्या मोटर सायकल स्वाराने विधानभवनापर्यंत आमदार अभिजीत आबा पाटील यांना आपल्या मोटरसायकल वर बसून त्यांनी विधान भवनात सोडले. या मोटरसायकल स्वाराचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आभार मानून आपल्या मतदारसंघातील लोक हिताची कामे हिरिहिरीने, पोट तिडकीने मांडण्यासाठी ते विधानभवनात पोहोचले.
आमदार अभिजीत आबा पाटील यांची ही धावपळ व लोक हितासाठी, लोक कार्यासाठी केलेली धडपड पाहता असा आमदार महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघांला लाभावा अशीच मनोभावना लोक व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा