" एडवोकेट बादल भाऊ यादव यांना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार घोषित" .


 पंढरपूर ( प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार हा पुरस्कार पूर्ण देशभरातील व महाराष्ट्रातील प्रतिष्ठित समजला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर शहरातील रहिवासी असलेले समाजसेवक एडवोकेट बादल भाऊ यादव यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

    एडवोकेट बागल भाऊ यादव हे दीन दुबळ्या दलितांना व बहुजनातील अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे करीत आहेत. आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून ते पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये समाजसेवेचे व्रत हे बजावत आहेत. एडवोकेट बादल भाऊ यादव यांच्या या कार्याला भारत सरकार च्या वतीने केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले तसेच केंद्रीय राज्य महिला बालकल्याण मंत्री रक्षा खडसे व इतर मंत्री व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत एडवोकेट बादल भाऊ यादव यांना दिल्ली येथे 5  ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

    एडवोकेट बादल भाऊ यादव यांना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल समाज बांधव व मित्र परिवारांच्याकडून हार्दिक अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....