" संभाजी ब्रिगेड पद्धतीने उत्तर दिले जाईल" प्रवीण गायकवाड.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे या कार्यक्रमास उपस्थित होणार होते. 

    शिवधर्म संघटना म्हणवणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकण्यात आली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध व्यक्त केला जाऊ लागला आहे. काल रोजी पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलत असताना प्रवीण गायकवाड म्हणाले मनुवादी विचारसरणीने पछाडलेले लोकांनी ही कृती केले आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करीत नाही, परंतु यापुढे संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर दिले जाईल. शेवटापासून आता सुरुवात असेल असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले 

     मनुवादी विचाराने पछाडलेल्या या लोकांनी यापूर्वी कॉम्रेड पानसरे डॉ. कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोळकर, डॉ. गौरी लंकेश या बहुजन नेत्यांच्या पुरोगामी विचाराला, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार परंपरेला खंडित करण्याच्या उद्देशाने या सर्वांची हत्या करण्यात आली. परंतु मनुष्य मेल्यानंतरही त्याचे विचार मारले जाऊ शकत नाही. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यावेळी पोलीस कुठेही उपस्थित नव्हते. त्यांचा बंदोबस्त नव्हता‌ कुठली सुरक्षा त्यावेळी त्या ठिकाणी नव्हती. याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री असून त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. दिपक कुटे नामक व्यक्ती हा भाजपाचा कार्यकर्ता असून त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे वेगळे सांगायला नको. असेही प्रवीण गायकवाड यांनी आज पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

     यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यामधील संभाजी ब्रिगेडचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....