."अरे... तू तो गद्दार निकला .....खंडणीखोर निकला" ....कोण? नितीन सरडे यांनी दिली माहिती.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्याची आणि या तालुक्यामधील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी सहकारी संस्था म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याची बदनामी करण्याचा उद्देशाने व चेअरमन अभिजीत आबा पाटील आमदार माढा विधानसभा मतदारसंघ यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने अनवली येथील रहिवासी किरण राज घोडके या तरुणांनी कारखाना व आमदार अभिजीत पाटील यांची बदनामी करण्याची कट कारस्थान रचून त्यांना खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून काल रोजी अटक करण्यात आली. अशी माहिती आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी दिली. 

      कारखान्याच्या कामगारांना भूल थापा देऊन त्या कामगारांना मी  तुम्हाला न्याय मिळवून देतो. असे कारणे सांगून पुढारपण करणाऱ्या या युवकाला अभिजीत पाटील यांनी पूर्वी सहकार्य केले होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता. त्याला चेअरमन पाटील यांनी आर्थिक सहकार्य देखील घर बांधण्यासाठी केले होते. याची थोडी देखील जाण न ठेवता या युवकाने खंडणी मागण्याचा उद्योग केला. ती खंडणी देखील थोडी थोडकी नसून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी दहा लाख रुपयाचे टोकन देण्याचे ठरले. हॉटेल राधेश या ठिकाणी नितीन सरडे व त्यांचे सोबती सहकारी यांनी ही रक्कम त्या ठिकाणी देण्याचे नियोजन केले. ही रक्कम दिल्यानंतर पोलीस पथकाने त्याला अटक करण्यात आली. 

     किरण राज घोडके राहणार अनवली त्याच्यावर खंडणीचा व बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. अशी माहिती आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी आज दिली. यावेळी नितीन सरडे यांनी कॉल रेकॉर्डिंग तसेच व्हिडिओ हे देखील सादर केले.

    या घटनेला... अरे यार तू तो गद्दार निकला.... खंडणीखोर निकला असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....