" मालमत्ता कर पंधरा दिवसांत भरा 1%सूट मिळवा".... पंढरपूर नगरपालिका.
पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर शहरातील रहिवाशांना पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता कर त्वरित भरावा म्हणून एक योजना आयोजित केली आहे .मालमत्ता कराची पावती मिळाल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसांमध्ये मालमत्ता कर हा ऑनलाइन व रोख रकमेच्या स्वरूपात भरल्यास एक टक्का सूट देण्याची योजना जाहीर केलेली आहे .अशी माहिती पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने दिली.
ऑनलाइन कर भरण्यासाठी खालील माहितीचा वापर करावा. म्हणून चीप ऑफिसर मुन्सिपल कौन्सिल पंढरपूर यांच्या नावे यांच्या खात्यावर बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आवाहन केलेले आहे. सोबत पंढरपूर नगरपालिकेने बँकेचा खाते क्रमांक दिलेला आहे. मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट काढून पाठवावा व त्याची पावती घ्यावी. पंढरपूर नगरपालिकेतील कर विभागाचे कर्मचारी सौ शिंदे व देवकर यांच्याकडे संपर्क साधावा. अशी माहिती पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा