" कॅरिडाॅर बाधितानी सर्व्हे करणाऱ्यांना माहिती देण्यास विरोध दर्शविला." शासन काय निर्णय घेणार?
पंढरपूर ( प्रतिनिधी). काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पंढरपूर येथे कॅरिडॉर बाधीत रहिवासी, व्यापारी,दुकानदार यांच्याशी संवाद साधला असता कॅरिडाॅर हा पंढरपूर शहराला कसा लाभदायक असणार आहे.याची माहिती दिली.वाढत्या भाविकांच्या गर्दीमुळे भाविकांना सुलभतेने दर्शन व शहरात वावरता येत नाही.काही अनवधानाने दुर्घटना घडल्यास गर्दीमध्ये भाविकांना मदत करता येणार नाही म्हणून शहरातील रस्ते व मंदिर परिसरात हा कॅरिडाॅर होणे गरजेचे आहे.असे प्रशासनाचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.त्यानुसार या बाधित परिसरात महाविद्यालयाचे विद्यार्थीच्या मदतीने सर्व्ह केले जात असताना शहरातील काही भागात या सर्व्हे करणाऱ्यांना विरोध दर्शविला गेला व या सर्व्हे करणाऱ्यांना माहिती देऊ नका असे आवाहन पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने केले जात होते.
अशाप्रकारे विरोध काही बाधीत रहिवासी व्यापारी दुकानदार करीत असल्याने शासन काय निर्णय घेणार या कडे पंढरपूर वासी चे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा