"अतिक्रमण करणाऱ्यानो सावधान " सोमवार पासून अतिक्रमण विरोधी कडक मोहिम "....... जिल्हाधिकारी

 पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर शहर श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वैकुंठ भूमी आज शहराच्या चौफेर बाजूने हे शहर वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

     लोकसंख्येच्या वाढीबरोबरच पंढरपूर शहरांमध्ये आषाढी कार्तिकी या वारी ला येणारे भाविक भक्तांची संख्या वाढत असलेली दिसून येत आहे. दरवर्षी कोठ्यावधीच्या संख्येने भावी भक्त या पंढरपूर शहराला भेट देत असतात. या पंढरपूर शहरांमध्ये आल्यानंतर भावीक भक्तांना रस्त्यावर अतिक्रमण हे सर्वत्र झाल्याचे दिसून येते. भाविकांना पायी चालताना फुटपाथ चा वापर करावा असे जरी वाटले तर त्यांना या फुटपाथवरून चालता येत नाही .कारण दुकानाच्या समोरील फुटपाथ वर खुद्द त्या दुकानदाराने अतिक्रमण केलेले असते किंवा हातगाडी व्यापारीनी हे फुटपाथ व्यापलेले दिसून येते. पंढरपूर शहरातील सर्वच रस्त्यावरून सद्यस्थितीला अतिक्रमण हे दिसून येत आहे. या अतिक्रमण हटावची जबाबदारी नगरपालिकेची असताना देखील नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. 

    पंढरपूर शहरात प्रत्येक रस्त्याला अतिक्रमण हे झालेले असल्यामुळे आज हे रस्ते मोठे करण्याचे नियोजन शासन करीत आहे .कॅरीडोर सारखी संकल्पना या ठिकाणी राबवली जात आहे. या सर्व घटकांचा त्रास स्थानिक रहिवासी दुकानदार व्यापारी यांनाच होत आहे. याची जाणीव पंढरपूर वासी व्यापाऱ्यांना आता होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आपले दुकान ग्राहकांना दिसून येत नाही म्हणून दुकानाच्या पुढील भागामध्ये अतिक्रमण ही केले जात आहे. अशा या अतिक्रमणामुळेच आज कॅरिडार सारखी संकल्पना शासन राबू पाहत आहे. 

    नुकतेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर येथे कॅरिडॉर च्या संदर्भात जनसंपर्क साधताना त्यांनी येत्या सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम ही कडक धोरण राबवणार आहे असे सूचित केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....