" मतदार खूश...उमेदवारांची कसोटी.... चौरंगी लढत अटळ"

 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मंगळवेढा मतदारसंघातील विविध पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

    एकूण अठरा जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

   भाजपाचे उमेदवार समाधान दादा अवताडे तसेच काॅंग्रस आय चे भगिरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील या विधानसभेच्या निवडणूकीची आतूरतेने सर्वसामान्य जनता वाट पहात आहे.पाच वर्षातून एकदा येणारी ही निवडणूक मतदारांच्या साठी सर्वं बाबतीत आनंदोत्सव साजरा करण्यासारखी असते.कोण किती मते घेणार? कोण कुठे कमी पडणार? कोण कोण सुक्या ओल्या पंगती उठवणार? मतागणिक अर्थ कारणांची चर्चा होत रहाणार.

    संविधानाने सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला आहे.परंतू ग्रामीण भाग सोडल्यास शहरी भागातून मतदान कमी प्रमाणात होत असते.सर्व सुविधा शहरी भागात प्रथम होत असतात.तरीही शहरी मतदार मतदान करण्यास टाळाटाळ करत असतो.हे नेहमी आपल्या नजरेस पडते.तरी शहरी भागातील मतदारांनी आपले मतदान जरुर करावे.असे आवाहन शासन नेहमीच करत असते.

     शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील जनता ही मतदान करण्यास हिरहिरीने जात असतो.शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण मतदाराच हुशार आणि सजग म्हणावे लागेल.पहावूया कोण बाजी मारणार ते......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....