"यशवंत माने पुन्हा एकदा बाजी मारणार? "
पंढरपूर ( प्रतिनिधी) मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत दिसून येत आहे.
रमेश कदम यांच्या पाणीदार पणामुळे ते चर्चित राहिले.त्यांच्यावरील आरोपांमुळे ते या मतदारसंघांतून गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसले नाही.परंतू या निवडणुकीत त्यांच्या कन्या सिध्दी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पक्षाचे ए.बी.फाॅर्म दिले गेले पुन्हा ते रद्द करण्यात आले.या गोंधळामुळे रमेश कदम गट नाराज झालेले आहे.तो काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.
गेली कित्येक महिने राजू खरे हे या मोहोळ मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येते.त्यांनी लोकवर्गणीतून जेवढे जास्त विकास कामे करता येतील तेवढे कामे करून ते या मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे राहू इच्छित आहे.
वरील परिस्थिती सद्या या मतदारसंघात दिसून येत आहे.यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रस मध्ये फूट पडल्याने ते अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी लागते आहे.मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा राजन पाटील यांचे या मतदारसंघात वजन आहे.ते जे म्हणतील तो उमेदवार निवडून येऊ शकतो हे आजपर्यंतच्या निवडणूकी वरुन दिसून येते.
आमदार यशवंत माने यांनी या मतदारसंघात विकास कामे केल्याचे ते सांगत आले आहेत.
राजन पाटील यांच्या जनसंपर्काचा लाभ हा यशवंत माने यांना होऊ शकतो.राजन पाटील यांच्या भरवशावर यशवंत माने हे पुन्हा निवडून येऊ शकतात.अशी परिस्थिती सद्या दिसून येत आहे.यशवंत माने यांनी कोट्यावधी चा निधीं हा या मतदारसंघात विकास कामासाठी आणलेला आहे.या विकास कामाच्या जोरावर ते निवडून येऊ शकतात.त्यामुळे यशवंत माने हे पुन्हा एकदा बाजी मारणार आहे अशी चर्चा सद्या या मतदारसंघात सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा