" समाधान आवताडे हे पाणीदार आमदार आहेत. समाधान आवताडे यांनी जनतेचे समाधान केले आहे".. देवेंद्र फडणवीस


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान अवताडे हे या तालुक्याचे पाणीदार आमदार आहेत.असा गौरवपूर्ण उल्लेख करीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी कौतुक केले.आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मधील  मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी,तामदर्डी बंधारा कर्जाळ कात्राळ हुलजंती,पौट,गोणेवाडी,ले.चिंचाळे NH 166.रस्ता या सर्व विकासकामांचा कार्यारंभ सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
    2019 च्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये मंगळवेढा येथे आल्यानंतर मी तुम्हा सर्वांना एक आवाहन केले होते. मला 106 वा आमदार मला निवडून द्या. मी करेक्ट कार्यक्रम करेन. आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो समाधान दादा अवताडे यांना विजयी करून दिल्यामुळे समाधान आवताडे यांच्या सहकार्याने मी करेक्ट कार्यक्रम करू शकलो. असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी मनोगत व्यक्त केले.
     आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे पंढरपूर मंगळवेढा भागातील विविध प्रश्नांच्यासाठी व विकास कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामे साठी लागणारा निधी हा आम्ही मंजूर केला. समाधाना अवताडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे या मतदारसंघांमध्ये विविध विकास कामे ती म्हणजे मंगळवेढा उपसा सिंचन योजना त्याचप्रमाणे या मतदारसंघातील रस्ते आणि पंढरपूर तालुक्यासाठी एमआयडीसी ही मंजूर करून व त्यासाठी निधी हा आणण्यामध्ये समाधान आवताडे हे यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले. पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेचे समाधान करण्याचे काम समाधान आवताडे यांनी केलेली आहे. असे कौतुकास्पद उल्लेख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज आंधळगाव या ठिकाणी केले. 
     महाराष्ट्र सरकारने विविध जनकल्याणाच्या योजना या आणले आहेत. त्या राबवण्याचे काम समाधान आवताडे यांनी केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे वीज बील माफ केलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या विजाचे बिल हे अठरा हजार वीस हजार येत होते. तर आम्ही हे वीज माफ केल्यानंतर अठरा हजार वीस हजार हे वीज बिल न येता फक्त शून्य शून्य हे बिल येते. सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या पीक पाण्याला पाणी मिळावे म्हणून तामदर्डी बंधारा ही योजना साठी आम्ही मंजुरी दिली. समाधान आवताडे यांनी मागणी केलेल्या सर्व विकास कामाला आम्ही मंजुरी व निधी दिलेला आहे.
    महाराष्ट्र शासनाने शेतीसाठी सौर ऊर्जाच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारी वीज ही पुरवली जाणार आहे. आता रात्रीच्या ऐवजी दिवसा देखील वीज शेतकरी बांधवांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणून सर्व भगिनींना आर्थिक मदत व आर्थिक सक्षम करण्याच्या प्रयत्न केलेला आहे. मुलींच्या साठी शिक्षण मोफत, त्याचप्रमाणे मुलीच्या जन्मापासून तेअठरा वर्षापर्यंतच्या वयापर्यंत लाख रुपये मिळण्याचे नियोजन केलेले आहे. 
    मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना पाणी पुरवण्याचे नियोजन करणार असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्ती आज रोजी आमदार समाधान आवताडे यांच्या कारकिर्दीमध्ये होत आहे. मंगळवेढा च्या 24 गावांमध्ये कधीच पाणी होऊ शकणार नाही. असे लोक म्हणत होते. परंतु केंद्र शासनाच्या मदतीने व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना पाणी पुरवण्याचे योजना आम्ही पूर्ण करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामधील देखील कित्येक तालुके व गावांना पाणीपुरवठा योजनेचे फायदा झालेला आहे. 
     महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये पाणी योजना राबवून शेतकऱ्यांच्या शेती पिकासाठी पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोजी आंधळगाव या ठिकाणी कार्यारंभाच्याप्रसंगी बोलत असताना त्यांनी सांगितले. 
   या कार्यारंभच्या कार्यक्रमास उपस्थित हजाराच्या संख्येने लोक जमले होते. सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार त्याचप्रमाणे शासनाचे विविध अधिकारी उच्च अधिकारी हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....