"जे दलित बांधव दीक्षाभूमी यात्रेला जाऊ शकले नाहीत.त्यांना ही यात्रा घडवणे हे माझे कर्तव्य ".... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दलित बांधव हे बांधव नागपूर या ठिकाणी धम्मचक्र या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेऊ शकत नव्हते, जेणेकरून या ठिकाणी जाऊन दीक्षाभूमी चे घेतलेले नाहीत. असे असंख्य दलित बांधव, माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार ही धम्म यात्रा आज रोजी सायंकाळी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. अशी माहिती मनसेचे नेते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी पत्रकारांना दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पर्यंतच्या कार्य काळामध्ये असंख्य सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे करत असते. सर्व धर्म समभाव या या भावनेने ही धम्मयात्रा आयोजित केलेली आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अजमेर या पवित्र ठिकाणी जाण्याचे कित्येक मुस्लिम ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध, माता भगिनी, तरुण यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या अजमेर या धार्मिक ठिकाणी जाता येत नव्हते. अशा मुस्लिम बांधवांच्या भावनेचा विचार करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अजमेर यात्रा ही देखील आम्ही घडवलेली होती. त्याचप्रमाणे ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बौद्ध धर्मीय बांधवांच्यासाठी ही धम्म यात्रा आम्ही आयोजित केलेली असून या धम्म यात्रेस जवळपास 2000 च्या संख्येने दलित बांधव आंबेडकर प्रेमी, बौद्ध प्रेमी हे एकूण 14 बसेस मधून हा प्रवास करणार आहेत. यांचीही धम्मयात्रा सुखकर व्हावी व त्यांना नागपूर येथील दीक्षाभूमी या पवित्र ठिकाणाचे दर्शन व्हावे. अशी आशा आम्ही व्यक्त करीत आहोत. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये त्याचप्रमाणे या धम्म यात्रेच्या बसेसना निरोप देतेवेळी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा