"तरुणांनी आपले शहर सोडून परराज्यात व अन्य ठिकाणी नोकरीला जाण्याची मानसिकता तयार ठेवावी" ..... संदीप मांडवे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून आपल्या बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींना भव्य नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याचा लाभ आपल्या परिसरातील तरुणांनी घ्यावा.
     आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आजच्या या भव्य नोकरी महोत्सवा मधून नोकरी प्राप्त होताच त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे व त्याचप्रमाणे परराज्यात व अन्य जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास ती सोडू नये आपले शहर व गाव सोडल्याशिवाय मनुष्याची प्रगती होत नसते. तरी या तरुणांनी आपले गाव सोडून अन्य परराज्यात व जिल्ह्यात जाऊन काम करण्याची मानसिकता ही बाळगायला हवी. असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंढरपूर शहराचे युवक नेते संदीप मांडवे यांनी आज या भव्य नोकरी महोत्सवाच्या प्रसंगी व्यक्त केले. 
    आज अनिल दादा सावंत यांच्या भव्य नोकरी महोत्सवास पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व अध्यक्ष नेते हे या नोकरी महोत्सव कार्यक्रमास आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून त्यांनी या महोत्सवास उपस्थिती दर्शवून अनिल दादा सावंत यांच्या या उपक्रमास पाठिंबा व सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. अनिल दादा सावंत यांच्या या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....