" हजारो कोटींचा निधी आणला म्हणून हे आमदार सांगतात मग विकास का झाला नाही?"...... मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालया समोरील रस्त्यावरील खड्डे पडले आहेत ते बुझवू शकत नाहीत.आणि जनतेला हजारों कोटीचा विकासनिधी आणला म्हणून सांगत आहेत.हे सत्ताधारी जनतेला फसवत आहेत.अशा खोटेबोल पण रेटून बोल अशा नेत्यांना जनतेनी घरचा रस्ता दाखवावा.

     पंढरपूर तालुक्यात शंभर गावे आहेत.हजारो कोटीचा निधी आला तर प्रत्येक गावाला ३० कोटी रुपये यायला हवे हे तीस कोटी रुपये गावांसाठी आले का? असा खोचक प्रश्न दिलीप बापू धोत्रे यांनी विचारला.

     मुंढेवाडी या गावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी आमदारांवर सडकून टीका केली.युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरलेल्या आमदाराला जनता पुन्हा निवडून देऊ नका.एम आय डी सी विरोध भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.हे पंढरपूर तालुक्यातील जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.येत्या विधानसभा निवडणुकीत या आमदाराला घरचा रस्ता दाखवावा.

      भारत भालके यांचे नाव घेऊन मतांसाठी राजकारण केले जात आहे.कै भारत भालके यांची परंपरा मी चालवत आहे.मला कोणते ही काम सांगा मी तुमचे काम केले शिवाय रहाणार नाही.जातीपातीचे राजकारण केले जात आहे.निवडणूक पुरते नातीगोती, पाहुणे मावळे या नेत्यांना आठवतात.अशा नेत्यांना जनतेने घरी बसवावे.

   यावेळी उपस्थित हजारो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....