माढा विधानसभा निवडणुकीत दोन साखर सम्राट आमनेसामने..... " अभिजीत आबा पाटील धुरळा उडवणार "
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध उपक्रम आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.महिलांच्या साठी खेळ मांडियेला, माढा केसरी कुस्ती स्पर्धा, बैलगाडा शर्यत इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित करुन माढा तालुक्यातील सर्व गावांमध्ये गावभेट दौरा करून शेतकरी कष्टकरी, व्यापारी, तरुण वर्ग, महिला भगिनी,या सर्वांना आपलेसे करण्यात अभिजीत आबा पाटील यशस्वी झाले चे दिसून येत आहे.
माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळाची हमी आणि सर्वात जास्त दर देण्याची त्यांनी दिलेली हमी यामुळे अभिजीत आबा पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच दिवसात लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.एक शेतकऱ्यांचा मुलगा साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर फक्त शेतकऱ्यांचे हीत जपत असतो. हे अभिजीत आबा पाटील यांनी दाखवून दिले आहे.
माढा तालुक्यात अभिजीत आबा पाटील यांचा शिरकाव झाल्यामुळे माढा तालुक्यातील सत्ताधारी आमदारांचे "टेंशन" वाढल्याचे दिसून येत आहे.माढा तालुक्यातील गावभेट दौरा ला मिळणारा जनतेतून प्रतिसाद पहाता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बदल घडणार हे निश्चित झाले आहे.
माढा तालुक्यातील बावी या गावी बैलगाडा शर्यत आयोजित करून लाखोंची बक्षिसे देण्यात आली.या बैलगाडा शर्यती मध्ये असंख्य शेतकऱ्यांनी आपला सहभाग घेतला होता.बावी येथील खुले बैलगाडा शर्यती च्या मैदानाने मोठी धमाल उडवून दिली.सुमारे दहा हजार बैलगाडा शर्यत प्रेमीनी या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याचे दिसून आले.
यावेळी अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले की माढा तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिल्यास विकास कामांचा धुरळा उडवून देऊ.आजपर्यंत माढा तालुक्यात या सत्ताधारी ना स्पर्धक नव्हता आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे.अशी टीका देखील विरोधकांवर केली.
या बैलगाडा शर्यती विजयी स्पर्धक प्रथम विजेता राजसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ,व तेजस भैय्या पाटील यांनी ही स्पर्धा जिंकली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा