"तरुणांना रोजगार मिळणे ही काळाची गरज " "मी आमदार होऊ न होऊ मी काम करीत रहाणार "...... अनिल दादा सावंत
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही वाढलेली आहे. ही वाढलेली बेरोजगारांची लोकसंख्या पाहता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भव्य नोकरी मेळावा आयोजित करून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा मुलांना नोकरी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या भावी नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध 50 कंपन्या या ठिकाणी आलेल्या असून या कंपन्या मधून फार्मासिस्ट इंजिनियर ,आयटी इंजिनियर त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील उद्योग, आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी मोटार कंपन्या तसेच अन्य उद्योगधंद्यामधून या अनुभवी व कुशल पात्र, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरी दिली जाणार आहे.
५० कंपन्यांमधून पाच हजाराच्या वरील कामगारांची संख्या या कंपन्यांना अपेक्षित असून आपल्या या रोजगार भव्य मेळाव्यामध्ये हजार ते दीड हजार युवकांनी आपली नोंदणी केलेली आहे. उपलब्ध नोकरीच्या संख्येने या दीड हजार विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध झालेली आहे. अशा तरुणांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लाभणार आहे. असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांनी आज भव्य नोकरी महोत्सव या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. माझ्या या मागणीला होकार मिळालेला असून उद्याच्या भविष्यामध्ये तिकीट मिळेल न मिळेल परंतु मी आमदार होऊ न होऊ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेचे काम करीत राहणार आहे. असे प्रतिपादन अनिल दादा सावंत यांनी आज रोजी केले .
भव्य नोकरी महोत्सवास उपस्थित नगरसेवक आदित्य दादा फतेपुरकर ,माजी उपनगराध्यक्ष व मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले, किरण घाडगे, संदीप मांडवे ,काँग्रेसचे सूर्यवंशी तसेच असंख्य मान्यवर हे उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा