"आराधी व तृतीय पंथीय असलेल्या लोकांना शासनाच्या सर्व योजना चा लाभ मिळवून देणार"...... मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे


 पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी स्टेशन रोड नवरात्र महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमानाने शारदीय महोत्सव यांच्या निमित्ताने पंढरपूर येथे संपन्न झाला. 

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी बोलताना म्हणाले की नवरात्र महोत्सव असल्याकारणाने वंचित दिन दुबळ्या सर्वसामान्य घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजातील आई भवानीचे भक्त म्हणून सेवा करणारे आराधी भक्त गोंधळी देवदासी तसेच तृतीयपंथीय यांचा सन्मान करण्यात यावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व देवी भक्तांचे त्यांच्या उपवासा निमित्ताने फराळ वाटप साडी चोळीचा आहेर देण्यात आला. याप्रसंगी सुमारे 300 देवी भक्तांचा सहभाग होता.

       दिलीप बाबू धोत्रे यांनी आपल्या मनोगतामधून त्यांनी बोलत असताना म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचा लाभ करून देणार आहे आई भवानी मातेच्या चरणी नतमस्त होऊन शब्द देतो की आपल्या कोणत्याही अडचणी  असल्यास मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण आपले मतदान रुपी आशीर्वाद देऊन सहकार्य करावे.

 असे आवाहन दिलीप बापू यांनी यावेळी केले 

     या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित नाना कदम, हरी बारुंगुळे, शशिकांत पाटील, दत्ता सिंह राजपूत आदी मान्यवर मंडळी व आराधी गोंधळी देवदासी तृतीयपंथी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....