"माढ्यातील मतदारांना अभिजीत आबा पाटील यांनी " वेड" लावले."



 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी या माढा तालुक्यातील राजकीय वातावरण हे ढवळून निघू लागलेले आहे.

    श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आपण माढा विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगून माढा विधानसभेला जोडून असलेले पंढरपूर तालुक्यातील 40 ,42 गावांचा समावेश आणि या गावांमधून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याचा उद्देशाने व या ऊस उत्पादकांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्याच्या महत्वकांक्षामुळे त्यांनी या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी प्रचंड प्रमाणात जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यानिमित्ताने सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचा आवडता बैलगाडा शर्यत आणि कुस्तीप्रेमी तरुणांसाठी माढा केसरी या कुस्त्यांचे आयोजन करून त्यांनी एक प्रकारे संपूर्ण माढा तालुका ढवळून काढलेला आहे. आणि माता भगिनींच्या साठी खेळ मांडीयेला या माध्यमातून त्यांनी माता भगिनींचा संपर्क सुद्धा साधलेला आहे. 

    आता माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना एक वेगळीच मेजवानी देण्याच्या तयारी अभिजीत आबा पाटील करीत आहे. अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणारे हे सांस्कृतिक महोत्सव माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव 2024 या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियाना आणि मंडप पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. 

    या कार्यक्रमाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय सोलापूर रोड माढा येथे करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 12 ते बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 या पाच दिवस चालणाऱ्या कृषी व सांस्कृतिक महोत्सवामध्ये कृषी विषयक तज्ञांचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साहित्य व प्रदर्शन येथील नागरिकांना पहावयास मिळणार आहे. या महोत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता भव्य शेतकरी मेळावा ने होणार आहे. या दिवशी दसरा आल्या असल्याने सायंकाळी सहा वाजता रावण दहन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन सायंकाळी सहा वाजता अभिनेत्री मानसी नाईक यांच्या महाराष्ट्राच्या हास्यविरांच्या सोबत कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सायंकाळी सहा वाजता हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन व भारुड कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता नफ्यातील दुग्ध व्यवसाय या विषयावर गंगाप्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र कॉमेडी कलाकार भाऊ कदम, मकरंद अनासपुरे यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अरुण देशमुख कृषी विद्या विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन व सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचा महा गायक आनंद शिंदे यांच्या लोकगीतेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा लाभ येथील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी केले.

   अभिजीत आबा पाटील यांनी सलग विविध उपक्रम राबवून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहे.माढा विधानसभा मधील मतदारांना अभिजीत पाटील यांनी वेड लावले आहे.संपूर्ण माढा मतदारसंघात एकच चर्चचे वलयांकित व्यक्तीमत्व म्हणजे अभिजीत आबा पाटील अशी सुरू आहे.

    यावेळी उपस्थित प्राचार्य सुनील केळकर सर अनिल काका देशमुख मानेगाव आबासाहेब साठे कृषी काका गंभीले अक्षय शिंदे जितू जमदाडे स्वाभिमान कदम उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....