तात्यासाहेब साळुंखे " महाराज" यांनी केला बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा यथोचित सत्कार
पंढरपूर ( प्रतिनिधी) आजच्या युवकांनी व्यायामाची आवड जोपासली पाहिजे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढते. शरीर व मन सुदृढ राहण्यास व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे. असे पंढरपूर येथील मुद्रांक लेखणिक तात्या महाराज साळुंखे यांनी आज पंढरपूर येथे एकलव्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा यथोचित सत्कार करतेवेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभा वेळी उपस्थित मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे प्रभारी अक्षयजी वाडकर, अर्जुन महाराज जाधव, मुकेश लकेरी, आबासाहेब जगताप, किशोर झेंड ,प्रदीप साळुंखे, युगंधर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकलव्य पुरस्कार प्राप्त विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले सध्याच्या जीवनामध्ये सर्वत्र धक्काधकीचे जीवन शैली ही दिसून येत आहे. सध्याच्या काळामध्ये युवकांचे आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. तरुणांनी दररोज व्यायाम करावा व आपले शरीर सुदृढ ठेवावे. व्यायाम केल्यामुळे शरीर व मन हे सुदृढ होते. निरोगी होते. सध्याच्या युवा पिढीने नियमितपणे व्यायाम करून त्या व्यायामासाठी योग्य ते मार्गदर्शन प्रशिक्षकांकडून घ्यायला हवे.
यावेळी सुनील आपटेकर यांनी आपल्या सत्कार प्रसंगी बोलत असताना ते म्हणाले सध्याचा युवक हा व्यसनाधीन होत चाललेला आहे. हे पाहून मनाला दुःख होते. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. दररोज अर्धा तास जरी व्यायाम केला तरी आपले शरीर व मन हे सुदृढ होते निरोगी राहते. लोकांनी व्यायाम करून आपले शरीर सुदृढ करावे. हे अत्यंत गरजेचे झालेले आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे आणि जे युवक व्यसनाधीन झालेले आहेत. अशा व्यसनाधीन युवकांना व्यसनापासून दूर करण्याचे काम व त्यांच्या मनामध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचे काम हे व्हायला हवे. युवकांनी आपला व्यायाम करत असताना योग्य ते मार्गदर्शन योग्य प्रशिक्षकांकडून घ्यायला हवे. त्याचप्रमाणे युवकांनी व्यायाम व आहार याचा समतोल राखून तन आणि मन हे सुदृढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी विविध क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवून त्यांनी आपले उत्तम करिअर करावे. उत्तम करिअरच्या संधी या युवकांना व्यायामाच्या माध्यमातून मिळू शकते. गेली अनेक वर्षापासून सुनील आपटेकर हे जरी बेळगाव निवासी असले तरी त्यांनी संपूर्ण भारतभर अनेक कॉलेजेस मधून शैक्षणिक संस्था मधून त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांना व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे व या युवक व युवतींना व्यायामाबाबतचे मार्गदर्शन सल्ला व आहार विषयी समतोल कसा साधला जावा याविषयीची माहिती ते या युवक युवतींना देतात. आणि त्याच निमित्ताने सुनील आपटेकर यांनी पंढरपूर येथे लोकांना व्यायामाचे आवड निर्माण करण्याच्या साठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते येथे आले असता आपले मनोगत पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले .
आपल्या देशांमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा क्रीडा विभागातील एकलव्य पुरस्कार विजेते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी नवीन पिढीतील युवकांच्या समोर एक प्रकारे आदर्श निर्माण केलेला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा