"स्त्री ही नवनिर्मितीची देवता आहे" .... अनिल दादा सावंत



 पंढरपूर ( प्रतिनिधी) स्त्री ही नवनिर्मितीची देवता आहे. नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव मानला जातो. धरती माता ज्याप्रमाणे माणूस जातीचे पालन पोषण करते नवनिर्मिती करते त्याचप्रमाणे स्त्री देखील नवनिर्मितीची देवता आहे. ज्याप्रमाणे धरणी माता विविध अन्नधान्य देऊन मानव जातीचे पालन पोषण करते त्याचप्रमाणे स्त्री ही देखील नवनिर्मितीची ज्वलंत मूर्ती असून तिच्या नवनिर्मितीमधून अनेक शूरवीर, विद्वान, संशोधक यांना जन्म देण्याची स्त्री शक्ती मध्ये ताकद आहे. या स्त्री शक्तीला प्रत्येक मानव जातीने वंदन करायला हवं तिचं रक्षण करायला हवं तिचा आदर करायला हवा. असे मनोगत आज रोजी अनिल सावंत यांनी दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त केले. 

     दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री शक्तीला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या उद्देशाने व चार भिंतीमध्ये कायमस्वरूपी आपल्या स्वतःला बंदिस्त करून घेणाऱ्या या स्त्रीला नवरात्राच्या महोत्सवाच्या निमित्ताने तिला या दांडियाच्या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा व तिला व्यक्त होण्याचे हे दांडिया महोत्सव एक कारण आहे. असे अनिल दादा सावंत आपल्या उद्घाटन प्रसंगी  बोलत असताना म्हणाले. 

     या दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाचे अंतर्गत विजेती संघाला 18 भव्य आकर्षक बक्षिसे ही दिली जाणार आहे. याची माहिती देखील आज रोजी त्यांनी दिली. 

      या कार्यक्रमाला उपस्थित एन आय टी चे अध्यक्ष श्याम गोगाव सर संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर साहेब आधी कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....