"जो काबील होगा, वही आमदार होगा"......... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये काल रोजी माढा महोत्सव व कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला. त्याचप्रमाणे विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी अभिजीत आबा बोलत असताना आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले की, एक पारंपारिक म्हण आहे." राजा का बेटा राजा बनेगा "परंतु आजच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे." जो काम करेगा ,जो काबिल होगा वही राज करेगा, वही आमदार होगा " असे त्यांनी माढा विधानसभेमधील विरोधक असलेले बबन दादा शिंदे यांच्यावर खोचक टीका केली.
माढा तालुक्यातील असंख्य गावे ही विकासापासून वंचित आहेत. शेतकरी बांधव हा आपल्या ऊसाला व अन्य पिकांना योग्य दर मिळत नाही म्हणून नाराज आहे. या शेतकरी बांधवांना आम्ही त्यांच्या ऊसाला चांगला दर देऊ ,जास्तीचा दर देऊ असे आश्वासन दिलेले आहे. व ते आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे. गेली 35 वर्ष या माढा तालुक्यामध्ये शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे. परंतु या सत्तेचा वापर त्यांनी कधीही सर्वसामान्य माढा मतदारसंघातील जनतेसाठी केलेला दिसून येत नाही. त्यांनी जर विकास केला असता तर या माढा तालुक्याच्या परिसरामध्ये उद्योगधंदे आले असते, शैक्षणिक संकुले उभारली गेली असती, इंजिनिअरिंग कॉलेज, आयटीआय कॉलेज तसेच अन्य शैक्षणिक सुविधा या उपलब्ध करून दिल्या असत्या. आणि त्याचप्रमाणे या कुठल्याही शैक्षणिक सुविधा या माढा तालुक्यामध्ये दिसून येत नाहीत. व केलेल्या नाहीत आणि माढा तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी ही गेली 35 वर्षात घेतली गेली नाही कारण या परिसरामध्ये कुठलेही मोठे वैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल उपलब्ध नाही. आणि माढा तालुक्यातील रस्त्याची अवस्था तर संपूर्ण जनता जाणते आहे.
माढा तालुक्यातील कित्येक गावांमधून विकासकामे न झाल्यामुळेच या भागातील मतदार हा सत्ताधारी प्रस्थापित असलेले नेत्यांवर हे नाराज आहेत. हे आज या जमलेल्या गर्दीमुळे तुम्हाला दिसून येत असेल. माढा तालुक्यातील मतदारांना आता बदल हवा आहे. या माढा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचारा सर्वसामान्य मतदारांना विचारा आणि बेरोजगार तरुणांना विचारा की तुम्हाला या विधानसभेसाठी काय अपेक्षित आहे. तर हे सर्व मतदार बांधव आपल्याला उत्तर देतील की आम्हाला बदल हवा आहे. या बदलाच्या आवश्यकतेमुळे मी माझी उमेदवारी या माढा विधानसभा मतदारसंघांमधून जाहीर केले आहे. शेतकऱ्याचा मुलगा आमदार व्हावा हे कोणत्याही शेतकऱ्याला आवडणारे आहे. आमदाराचा मुलगा आमदार झाला पाहिजे ही मनोधारना बदल करण्याच्या विचारात माढा मतदारसंघातील मतदार आहेत.
आज विजयादशमीच्या निमित्ताने माढा या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम पार पडण्यात आला. रावण ही दृष्ट प्रवृत्ती आहे. या दृष्ट प्रवृत्तीचा नाश करायचा असेल तर या प्रवृत्तीचे दहन करायला हवे.श्रीरामासारख्या पुरुषोत्तमा बरोबर वानरसेना असल्यामुळे या रावणाचा पराभव झाला. या विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा हा कार्यक्रम सर्वत्र पार पाडला जातो.
माढा तालुक्यातील व या मतदारसंघातील तरुण वर्ग हा माझ्याबरोबर आहे. या तरुणांच्या मदतीनेच व सहकार्याने आणि येथील मतदार बांधवांच्या वतीने येथे बदल करणार आहे. या माढा तालुक्यातील विकास कामे व बेरोजगार तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभावे म्हणून मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रयत्न करणार आहे. या माढा तालुक्यातील तरुण वर्ग जेष्ठ नागरिक माता भगिनी या माझ्या पाठीशी उभ्या राहणार आहेत. कारण त्यांना आता बदल हवा आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा येथील सांस्कृतिक व कृषी महोत्सव व रावण दहन या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा