"निवडणूकी मध्ये परिवर्तन होणार हे दिसू लागले "..... मतदार आता दादा नव्हे फक्त आबा म्हणू लागले

 

पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदरच मतदार म्हणू लागले आता दादा नव्हे फक्त आबा म्हणू लागले .

    माढा मतदारसंघात गेली पस्तीस वर्षे एकच बाजूने भाकरी भाजली जात होती .आता ती भाकरी करपू लागली आहे.याची जाणीव या मतदारसंघातील मतदारांना होऊ लागल्याने आता या माढा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.असे चित्र या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येऊ लागले आहे.

    गेली पाच सहा टर्म विधानसभेच्या निवडणुकीत बबनदादा शिंदे यांना जनतेनी निवडून दिले परंतु कोणताच अमुलाग्र बदल या मतदारसंघात झाला नाही.शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असो की तरुण बेरोजगारांचा प्रश्न असो.पाणी उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था या माढा तालुक्यात कित्येक गावांमधून दिसून येते.आपले बगलबच्चे सांभाळण्यात इतकी वर्षे गेली.अशी समजूत माढा मतदार संघातील जनतेची झाली आहे.

    या विधानसभा निवडणुकीत बदल हवा आहे.परिवर्तन हवे आहे.अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात तयार झाली आहे.प्रस्थापित आमदारांनी विकासाची गंगा फक्त आपल्या भोवतीच फिरवली , विकासाची गंगा माढा मतदारसंघात कुठेच दिसत नाही.माढा मतदारसंघातील रस्ते, पाणी प्रश्न,

सर्व सोयी सुविधा एमआयडीसी साठी उपलब्ध असताना मोठे उद्योग धंदे आणले गेले नाही.ही जनतेच्या मनातील भावना व्यक्त होऊ लागली आहे.

     श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजनांचा समावेश त्यांनी आपल्या कारकीर्दीत सुरू करुन शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.

    शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऊसाला दर ३५०० रुपये जाहीर करण्यात आला.संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाला दर दिला जाणार आहे.अन्य साखर कारखानदारांच्या दरा पेक्षा दोन रुपये जास्तीचा दर दिला जाईल.असे घोषीत करुन विरोधकांच्या पायात फटाका फोडला आहे.विरोधक हवालदिल झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

    माढा मतदारसंघातून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून, तसेच शेतकऱ्यांच्या साठी कृषी प्रदर्शन आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.जे आजपर्यंत कधीच घडले नव्हते ते करून दाखवण्याची संधी अभिजीत आबा पाटील यांना मिळाल्याने त्यांनी या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये थोड्याच दिवसात जनसंपर्क वाढवून लोकांची मने जिंकली आहेत.या सर्व घडामोडी पहाता या निवडणुकीत परिवर्तन होणार बदल होणार हे दिसू लागले आहे.



.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....