"उद्या हजारो युवकांना नोकरी मिळणार " अनिल दादा सावंत यांचा " भव्य नोकरी महोत्सव"


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. हा भव्य नोकरी महोत्सव अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरवला जाणार आहे. उद्या दिनांक 6 रविवार 2024 रोजी संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी दहावी, बारावी, त्याचप्रमाणे आयटीआय, इंजिनियर तसेच अन्य प्रशिक्षण घेतलेले युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 
      यावेळी वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागी होणार असून या 50 कंपन्यांच्या माध्यमातून येऊ युवक व युवतींना नोकरी लाभणार आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. तरी गरजू बेरोजगार तरुणांनी आपले शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रे सोबत आणावीत. असे आवाहन करण्यात आले आहे. तरी बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा. 
     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कित्येक सुशिक्षित बेरोजगार नोकरी पासून वंचित राहिलेले आहेत. अशा युवकांना नोकरी मिळावी म्हणून व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा म्हणून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत यांनी हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. आज पर्यंत पंढरपूर  मंगळवेढा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांनी व राजकीय पुढार्‍यांनी फक्त आश्वासने देण्याची काम केलेली आहे. परंतु युवकांना नोकरी देण्याची मानसिकता या नेतेमंडळींच्याकडे नव्हती परंतु आज तरुण बेरोजगार यांचे दुःख जाणून असलेले अनिल दादा सावंत यांनी हा नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्यांच्या या भव्य नोकरी महोत्सवाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....