"विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने माझ्या प्रचार सभेत तेअडथळा आणतं आहेत." मनसे नेते दिलीप बापू धोत्रे

 


पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माझ्या गाव भेटीच्या माध्यमातून मला मिळणारा प्रतिसाद तसेच बेरोजगार युवक तरुण आणि महिला वर्गांच्या मधून मला मिळणारा वाढता प्रतिसाद मतदारसंघातील विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावी प्रचार सभेमध्ये बोलत असताना ते म्हणाले. 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणावर तसेच विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. पंढरपूर शहर असो पंढरपूर तालुका असो किंवा मंगळवेढा तालुका असो या सर्व मतदारसंघांमध्ये आम्ही गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून गेलो आहोत. कित्येक गरजूंना मदत केली आहे. सर्वसामान्य जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेने पाहत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा मध्ये फिरत असताना प्रत्येक गावांमधून वाड्यावस्ती मधून आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. त्यामुळेच माझ्या प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने काही समाजकंटक लोक नशा पाणी करून प्रचार सभेमध्ये अडथळा आणू पाहत आहेत.

     प्रचार सभा आटोपल्यानंतर या घडलेल्या प्रकारावर बोलत असताना दिलीप बापू धोत्रे यांनी तेथील जमलेल्या महिलांशी संवाद साधला असता त्या महिला म्हणाल्या की आम्हाला कोणीही प्रलोभन दाखवून येथे बोलावलेले नाही. आम्ही स्वतःहून दिलीप बापू धोत्रे यांचे कार्य पाहून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. असे त्या महिलांनी जाहीरपणे सांगितले.        काही विरोधक अशा समाजकंटकांना प्रचार सभेमध्ये अडथळा आणण्यासाठी  सोडून देतात. असे मनोगत असंख्य महिलांनी यावेळी व्यक्त केले. 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी पुढे बोलत म्हणाले या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये माझे कार्य पाहून या भागातील जनता माझ्याकडे आशेने पाहत आहे. परंतु विरोधकांना माझा हा वाढता जन संपर्क व मला मिळणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचार सभेत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....