"निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्ते माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले तर मी निवडणूक लढवणारच"...... वसंत नाना देशमुख
पंढरपूर ( प्रतिनिधी) आजच्या शुभ मुहूर्तावर वसंत नाना देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये वसंत नाना देशमुख म्हणाले आम्ही आज शुभ मुहूर्त पाहून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातील अध्यक्षांना खासदारांना त्याचप्रमाणे पवार साहेबांना आम्ही भेटून उमेदवारीची मागणी केलेली आहे. त्यांनीं आमच्या या भेटीमध्ये सकारात्मक भूमिका नेते मंडळींनी व्यक्त केली आहे. म्हणून आम्ही आज उमेदवारी अर्ज भरत आहोत. असे वसंत नाना देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.
वसंत नाना देशमुख आपल्या मुलाखतीमध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं ठरवलं तर मी निवडणूक माघार घेणार नाही. पवार साहेबांच्या कडे या निवडणुकीसाठी 11 जणांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. कुणाला राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाची उमेदवारी मिळते हे लवकरच कळेल. माझ्या या विचाराशी सहमत असलेले असंख्य ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते व मित्र मंडळ ते माझ्या पाठीशी असल्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरीत आहे. असे वसंत नाना देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा