"मनसेचे नेते दिलीप बापू यांनी महिलांना सतत सहकार्य केले आहे " डॉ.कराळे ताई


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सतत सहकार्य करण्याचे काम मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे करीत आहेत.पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य महिला या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जावा म्हणून प्रयत्न करीत असतात.असंख्य महिला आपले गृहोपयोगी वस्तू तयार करून आपले कुटुंब चालवत असतात.अशा गरजू महिलांना आर्थिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून यंदाच्या दिपावलीच्या निमित्ताने पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने दिपावलीच्या निमित्ताने खाद्यपदार्थाचे व अन्य दिवाळीनिमित्त आकाश कंदील, फराळ सामान,पणती,मेणबत्त्या, हस्तकलेच्या वस्तू वीजेची उपकरणे,आदी महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी स्टॉल वर ठेवण्यात आले आहेत.अशी माहिती आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्या अध्यक्षा डॉ.कराळेताई यांनी या एक्सपो च्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी दिली.

    मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.दिलिप बापू धोत्रे यांचे सहकार्य लाभले आहे.या ठिकाणी असलेल्या स्टॉल भाडे आकारले नाही.आणि दोन दिवस चालणाऱ्या या एक्सपो ला चार दिवस चालू रहाणार आहे.या बाबतीत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सहकार्य केले आहे.

    सर्वसामान्य जनतेसाठी एक सामान्य कुटुंबातील युवक अथकपणे धडपडत आहे.अशा दिलीप बापू धोत्रे यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यावी अशी अपेक्षा डॉ.कराळे ताई यांनी यावेळी व्यक्त केली.

    या कार्यक्रमाला उपस्थित पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी व्यवस्थापक सुनिल मोहिते साहेब , माजी नगरसेवक महंमद उस्ताद, मनसेचे नेते शशीकांत पाटील , समाजसेवक बाबा चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....