"विकासकामे पाहून विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरुन लागली आहे ".... आमदार समाधान दादा अवताडे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . विरोधक माझ्यावर टीका करीत आहेत की हजारो कोटीची विकास कामे कुठे दिसून येत नाही. परंतु मी त्या विरोधकांना सांगू  की तुम्ही मतदार संघातील गावांमधून फेरफटका मारलाच नाही तर तुम्हाला विकासकामे कशी दिसून येतील. आम्ही केलेली विकास कामे ही पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. 

     पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सामाजिक आणि सार्वजनिक विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सरकारने खूप निधी व सहकार्य केले आहे.उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व सहकारी मंत्री या सर्वांनी सहकार्य केले आहे.

    मंगळवेढा उपसा सिंचन योजना मुळे मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.तामदर्डी बंधाराची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.त्यामुळे शेकडो एकर जमीन ओलीता खाली येऊन या भागा मध्ये सुजलाम सुफलाम होईल.त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी द्यावा.म्हणजे या भागात पाणी कमी पडणार नाही.पूर्वी पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था होती.या बंधारा मुळे लोकांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

    टेंबूचे येणार नाही असे लोक म्हणत होते.परंतू माण नदीत हे पाणी आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

    या पाण्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील गावे ही दुष्काळी रहाणार नाही.हा तालुका शेतीमध्ये अग्रणी रहाणार आहे.द्राक्षे,बोर, डाळींब,ऊस ही पीके घेण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने ४८ हजार शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले आहे.लाडकी बहीण योजनेमधून सर्व भगिनींना आर्थिक मदत व सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

    भाजपा सरकारने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध प्रकारच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.हा मतदार संघ भाजपाच्या पाठीशी उभा रहाणार आहे.याची ग्वाही आज मी देत आहे.असे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांचे कार्यारंभ सोहळा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

   या कार्यक्रमाला उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार, जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....