"आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्याचा आज गौरव होणार " देवेंद्र फडणवीस आज विकासाची नवीन घोषणा करणार....


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये शासनाकडून खेचून आणलेल्या हजारो कोटीच्या कामाचा त्याचप्रमाणे नवीन मंजूर असलेल्या 24 गावचा पाणी योजना, त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा कार्यारंभ आणि पंढरपूर तालुक्याला आज पर्यंत बेरोजगार तरुणांना अनेक विरोध-माजी आमदार लोकांनी एमआयडीसी करतो म्हणून झुलवत ठेवले होते. त्या एमआयडीसीच्या कार्यारंभचा शुभारंभ आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.

     पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मोजक्याच आमदारकीच्या कारकिर्दीच्या वर्षामध्ये असंख्य विकासकामे ही शासनाकडून खेचून आणलेली आहेत .हजारो कोटीचा निधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध कामासाठी मंजूर करून आणला. त्याचप्रमाणे आपल्या गाव भेटीच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांनी मिळवलेले असून या गाव भेटीच्या दौऱ्यामुळे त्यांची कार्यसम्राट म्हणून ओळख या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये झालेली आहे. गाव भेटीच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढलेला असून या गाव भेटीच्या माध्यमातून त्यांनी भाजपा सरकारने केलेले असंख्य जनकल्याणकारी योजना त्याने आपल्या मतदारसंघांमध्ये राबवलेले आहेत. या सर्व कार्याचा लेखाजोखा आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी विविध विकास कामाचा कार्यारंभ आज होणार असून या कार्याचा कार्यारंभ आज रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील हजारोच्या संख्येने सर्वसामान्य जनता उपस्थित होणार आहे. 

    पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी असंख्य विकास कामे केलेली आहे. या विकास कामांना शुभारंभ करून त्याचप्रमाणे हजारो कोटीचा निधी मंजूर करून आणून त्यांनी "आपण कमी बोलतो पण काम जास्त करतो" हे सिद्ध करून दाखवलेले आहे. या कार्याचा गौरव आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. आणि त्याच प्रमाणे पंढरपूर मंगळवेढा विकास कामासाठी नवीन घोषणा हे करणार असल्याचे समजते. नवीन योजना, नवीन विकास कामे ही आज घोषित होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....