"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा "
पंढरपूर ( प्रतिनिधी) धम्म चक्र परिवर्तन दिन दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर १४ आक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी आपल्या अनुयायी सोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.हा धम्म चक्र परिवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो.
पंढरपूर येथील या धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या मिरवणुकीत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे सहभागी होऊन त्यांनी या परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या मिरवणूकीचे आयोजन भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ चे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्व गोड, जेष्ठ नेते नानासाहेब कदम,अमितराज उबाळे, शिवाजी चंदनशिवे,रवि सर्वगोड, सचिन भोरकडे, किशोर खिलारे, विठ्ठल वाघमारे, सागर गायकवाड,आदी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गाण्याच्या तालावर लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा