"मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा दुष्काळ कायमचा संपणार"..... आमदार समाधान दादा अवताडे.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) मंगळवेढा उपसा सिंचन या योजनेला समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यातील 111 कोटीचे टेंडर निघून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला. 

   या पाणी उपसा सिंचनाच्या कार्यक्रमानंतर आमदार समाधान दादा अवताडे यांनी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मंगळवेढा उपसा सिंचनासाठी दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक असलेला निधी अष्टयात्तर कोटी रुपये 43 लाख हे टेंडर काल रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मंगळवेढा उपसा सिंचनावर टीका करणाऱ्या विरोधकांचे तोंड आता बंद होणार आहे. 

    मंगळवेढा तालुक्यातील कित्येक गावांचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. असे समाधान आवताडे यांनी आज रोजी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मंजुरी मिळाली होती. परंतु त्यावेळी केवळ राजकारणासाठी ही लोकसभेच्या तोंडावर मंजुरी दिली असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरुद्धकांनी केली होती. परंतु मंजुरीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली होती. पहिला टेंडर नंतर दुसऱ्या टप्प्यासाठी देखील कोट्यावधी रुपयाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे देखील टेंडर निघालेले आहे. अशी माहिती समाधान आवताडे यांनी दिली. 

    697 कोटी रुपयाचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पंपग्रह टप्पा दोन संरक्षक भिंती बॅलन्सिंग टॅंक उर्द्वगामी नलिका दोन लेंडवे चिंचाळे मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण या व्यवस्थेचे काम तसेच योजना कार्यान्वित करणे पाच वर्षे परिचलन देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणी वापर संस्था स्थापन करून सर्व वितरण व्यवस्थापन करणे या बाबी दुसऱ्या टप्प्यातील टेंडरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही योजना वर्षानुवर्षी राजकारणाचा मुद्दा ठरल्याने मृगजळ वाटत होती. मात्र आमदार समाधान आवताडे यांनी या योजनेचे काम सुरू केल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पाणी येईल असे वाटू लागले आहे. 

    2009 पासून आम्ही या 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने आंदोलन करून व त्या त्या लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेतले. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून पहिला टप्प्यातील कार्यारंभ व दुसऱ्या टप्प्यातील निघालेली निविदा हे या दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा देणाऱ्या घटना आहेत. या योजनेच्या लाभ क्षेत्रातील सर्व क्षेत्राला शंभर टक्के ठिबक सिंचन प्रत्यक्ष शेतकऱ्याला सोलार पंप व शेततळे शासनाने विशेष योजना राबवून देण्यासंदर्भात पायलेट प्रोजेक्ट राबवण्याची मागणी आम्ही करणार आहे. अशी माहिती भाजपाचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार समाधान आवताडे यांनी आज रोजी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....