"मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा गाव भेटीच्या झंझावात सुरू"
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली, असून दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर शहरांमधील विविध ठिकाणी भेटी देऊन जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे ३ ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2024 या तीन दिवसाच्या दरम्यान मध्ये पंढरपूर मतदार संघातील खर्डी येथील ग्रामदैवत सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन गाव भेटीचा दौरा सुरू करण्यात येणार आहे. तपकीर शेटफळ, तावशी, सिद्धेवाडी, शिरगाव, एकलासपूर, अनवली ,रांजणी, मुंडेवाडी, गोपाळपूर ,उंबरगाव, बोहाळी, कोर्टी, टाकळी, गादेगाव, कवठाळी ,शिरडोण वाखरी आणि कासेगाव या पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या गावामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे गाव भेटीचा दौरा हा सुरू करणार आहे. त्या गाव भेटीच्या दरम्यान मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आजपर्यंतचे कार्य पंढरपूर मंगळवेढा तालुक्यांमध्ये त्याचप्रमाणे शहरांमध्ये केलेले विविध सामाजिक उपक्रम शासन दरबारामध्ये जनतेच्या हिताची केलेली कामे याची माहिती बापू धोत्रे हे या गाव भेटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मतदार बंधू आणि भगिनींना ते सांगणार आहे.
मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले असून त्याचप्रमाणे समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक, भगीरथ भालके यांच्या गटातील नाराज झालेले असंख्य कार्यकर्ते हे देखील दिलीप बापू धोत्रे यांच्या संपर्कामध्ये असल्याचे दिसून येते. मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या या गाव भेटीच्या दौऱ्यामुळे भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट या राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली असून एक कट्टर आणि प्रामाणिक जनसेवक मनसेच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याला भावी आमदार म्हणून लाभणार असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा