अनिल सावंत झाले सक्रिय... गणेशोत्सव निमित्ताने विविध उपक्रम..
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून येत्या विधानसभेलाआपली उमेदवारी असणार असल्याची माहिती अनिल सावंत यांनी देऊन पंढरपूर तसेच मंगळवेढा शहर व तालुक्यामधून आपला जनसंपर्क वाढवण्यावर सावंत यांनी भर दिलेला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मंगळवेढा तालुका व शहर या परिसरातील बेरोजगार तसेच शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक संजीवनी देण्याचे काम अनिल सावंत यांनी केलेले आहे. त्यामुळे मंगळवेढा व सर्व तालुक्यामधून अनिल सावंत यांचा जन संपर्क हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्याच प्रमाणे पंढरपूर शहर येथे ते राहत असल्यामुळे पंढरपूर शहर व या परिसरातील ग्रामीण भागामधील अडीअडचणी समस्या याची त्यांना जाण आहे. या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामे त्याचप्रमाणे तरुण बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याचे काम अनिल सावंत यांनी केले आहे.
अनिल सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने येत्या गणेशोत्सव सणानिमित्त पंढरपूर शहर व विविध भागांमध्ये दोन हजार कुटुंबांना मोफत गणेश मूर्ती भेट देणार आहेत. आणि पन्नास हजार आरती संग्रह तसेच 200 फलक ही वितरित करण्यात येणार आहे. अनिल सावंत यांनी आजपर्यंत राबवलेले विधायक उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या 50 हजार परिचय पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल, पंढरपूर शहर प्रमुख विश्वजीत भोसले संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत दादा कदम, माऊली गांडुळे, अमोल आटकळे, श्याम गोगाव सर, समाधान जाधव, गुरु ठिगळे, कृष्णदेव लोंढे, बंडु जाधव, तानाजी चव्हाण, देवकर गुरुजी, सुभाष साळुंखे ,गणेश घोडके अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा