" महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा अजूनही अंत पाहू नये"..... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेले मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अंतरावरील सराटी येथील उपोषण स्थळी भेट दिली. असता अभिजीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता ते मराठा समाजासाठी झटत आहेत, लढत आहेत. त्यांची सध्या तब्येत खालवलेली असून त्यांना बसायला किंवा बोलायला देखील येत नाही. त्यांच्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही. मराठा समाजाचे भले व्हावे म्हणून तडफडणारा जीव बघितल्यानंतर महाराष्ट्र शासनाला विनंती करावीशी वाटते की महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मराठा समाजाचा अजूनही अंत पाहु नये. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या भावना या जरांगे पाटील यांच्याशी जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घ्यावा व मागण्या मान्य कराव्यात. अशी कळकळीची विनंती महाराष्ट्र शासनाला अभिजीत पाटील यांनी केली.
अंतरावली सराटी येथे भेटीदरम्यान औदुंबर महाडिक देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तंबीले,वायजी भोसले रंजीत भोसले, जनक भोसले, पंकज लामकाने, अनिल यादव, कुलदीप कोलगे, शहाजी मुळे, दादासाहेब शिंदे, दिगंबर खडके, दादा पाटील, राज लोंढे, सचिन पाटील, महेश खटके ,अतुल गायकवाड, सुनील भोसले, कालिदास साळुंखे, सरपंच सोमनाथ झांबरे, विकास पाटील, नवनाथ नाईक नवरे, गोपाळ पाटील यासह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा