" आमदार साहेबांना मतदारांचे "समाधान" करण्यासाठी खूप पळावे लागणार" ... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेचे मत.


 पंढरपूर (प्रतिनिधी) येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका या जाहीर होतील, आणि या विधानसभेच्या  निवडणुकीमध्ये आजी-माजी आमदार, भावी आमदार, आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. 

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सध्याचे आमदार समाधान दादा अवताडे त्याचप्रमाणे भाजपा या पक्षाचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि त्याचबरोबर गत विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये थोडक्या मताने पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके असे तगडे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये  ठामपणे उभे रहाणार समजले जातात .आणि आता नवीन भावी आमदार म्हणून प्रसिद्धीला येऊ पाहत असलेले डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांचे पुतणे अनिल सावंत हे देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहण्याची त्यांची तयारी आता सुरू झाल्याची दिसून येत आहे. मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी तर आपली उमेदवारी केव्हाच जाहीर केलेली आहे ते देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सक्रिय झाल्याचे आज रोजी ला दिसत आहे. 

   या सर्व पक्षीय इच्छुक व आजी-माजी उमेदवारांच्या बरोबरीनेच या पक्षीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आता विधानसभेसाठी आपण सक्रिय आहोत, असे म्हणून जेष्ठ नेत्यांच्या विरोधात दंड थोपटल्याचे चित्र देखील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून दिसून येत आहे. परिचारक गटाचे व पांडुरंग परिवाराचे जेष्ठ नेते वसंत नाना देशमुख यांनी देखील विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्याचप्रमाणे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी देखील विधानसभेसाठी तयारी सुरू केल्याची दिसून येत आहे. 

    अशा या रथी महारथी नेते मंडळींनी एकमेकांच्या विरोधात आपली उमेदवारी असणार असल्याची कार्यकर्त्यांना ग्वाही देत आपले मतदार संघातील जनतेला व कार्यकर्त्यांना भेटण्याचे सत्र सुरू केलेले आहेत. 

     पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजपा चे आमदार समाधान दादा अवताडे यांना  पोट निवडणुकी मधून निवडून आल्यानंतर नाम मात्र तीन ते चार वर्षाचीच आमदारकीची सेवा करण्याचा कार्यकाळ त्यांना लाभलेला आहे. या त्यांच्या चार वर्षाच्या आमदारकी मध्ये त्यांनी असंख्य योजना आणल्याचे ते सांगत आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्याचे व त्यासाठी निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंढरपूर शहरातील बेरोजगारांना एमआयडीसीच्या माध्यमातून हाताला काम देण्याचा उद्देशाने त्यांनी कासेगाव या परिसरामध्ये एमआयडीसी मंजूर करून आणलेली आहे. आणि शहरातील अन्य विकास कामांमध्ये त्यांनी निधी आणून त्या निधीच्या माध्यमातून विकास कामे केल्याचे ते सांगत आहेत. आमदार समाधान दादा अवताडे यांना कमी कालावधी आमदारकीच्या मिळाल्यानंतर देखील त्यांनी भरपूर असे कार्य केल्याचे दिसत आहे. परंतु या त्यांच्या कार्याला विधान परिषदेचे माजी आमदार परिचारक यांचा हातभार असल्याचे स्वतः खुद्द परिचारक सांगतात. परंतु आमदार या नात्याने समाधान आवताडे यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने बोलणे कमी परंतु काम जास्त ही त्यांची कामाची पद्धत असल्याचे दिसून येते. या विधानसभेला त्यांच्याच भाजपा पक्षातील माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील इच्छुक असल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांना येणारी विधानसभा ही जड जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. भगीरथ भालके हे देखील आमदारकीच्या रिंगणामध्ये असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मनसेचे दिलीप धोत्रे तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत असे मोठे मोठे राजकीय व्यक्ती या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. असे सद्यस्थितीला तरी चित्र आहे. या चौरंगी, पंचरंगी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांना विजयश्री खेचून आणताना खूप पळावे लागणार आहे. या विधानसभेला आमदार समाधान आवताडे यांची "दमछाक"  होणार एवढे मात्र निश्चित. असे सद्यस्थितीला तरी चित्र दिसून येत आहे. पाहूया येत्या  विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदारकीची माळ कोण खेचून आणणार ही चर्चा पंढरपूर मंगळवेढामतदार संघातील जनता ही करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....