गौराई घ्या सणाला " लाडकी बहीण योजनेचा देखावा" देगाव येथील घाडगे वस्ती येथील लखन घाडगे यांच्या घरी नाविन्यपूर्ण देखावा


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावातील घाडगे वस्ती या ठिकाणी लखन विलास घाडगे, व अविनाश विलास घाडगे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौराईचे स्वागत केले जाते. 

     गौराईच्या सणानिमित्त घाडगे कुटुंब हे प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण देखावा ते आपल्या गौराईच्या सणानिमित्त करतात प्रत्येक वर्षी समाज प्रबोधनात्मक तसेच समाज जागृती चे देखावे ते तयार करत असतात त्यामुळे संपूर्ण देगाव या गावातील घाडगे वस्ती या ठिकाणी देगाव ग्रामस्थ हे घाडगे कुटुंबीयांच्या घरी गौराईचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून जातात. 

    कोरोना कालावधीमध्ये गौराईच्या समोर कोरोना रोगापासून कसा बचाव करावा याचा देखावा तयार करण्यात आला होता. या देखाव्याला भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली मिळाली होती सतत नाविन्याचा शोध व समाज प्रबोधन करण्याची घाडगे कुटुंबीयांची धडपड पाहता यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली असून या लाडक्या बहिणीची माहिती त्याचप्रमाणे बँक खाते कसे उघडावे व लाडके बहीण योजनेचा अर्ज कसा भरावा अशा पद्धतीचा देखावा घाडगे यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सध्या सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....