"देशमुख, शहा, भोसले या आम्हा तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळू शकते " .... नागेश भोसले
पंढरपूर ( प्रतिनिधी) येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभे मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या तिकिटासाठी असंख्य लोक आजी-माजी आमदार तसेच नवे इच्छुक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाची उमेदवारी मागत आहेत. आम्ही देखील पक्षाचे तिकीट मागण्यासाठी पवार साहेबांच्या कडे गेलो होतो. आम्हा तिघांना वसंत नाना देशमुख तसेच मंगळवेढ्याचे शहा व मी स्वतः वैयक्तिक उमेदवारी मागितली आहे. तिघापैकी कोणालाही विधानसभेचे उमेदवारी मिळाली तर आम्ही तिघे एकत्र मिळून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने आमच्यासारख्या नवीन चेहऱ्याला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून काम करण्याची संधी मिळावी. अशी अपेक्षा पंढरपूर नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये त्याने आपले मनोगत व्यक्त केले.
वसंत नाना देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा विचारविनिमय मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील असंख्य नेते ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कार्यकर्ते नगरसेवक हे उपस्थित होते.
येत्या विधानसभेच्या निवडणुकीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून एका नवीन चेहऱ्याला संधी मिळणार हे निश्चित झाले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा