सर्वच बाबतीत "आप्पा माणूस" असलेले व्यक्तिमत्व.......किरण आप्पा भोसले
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यामधून असंख्य कार्यकर्ते स्नेही व मित्र मंडळ यांच्याकडून किरण आप्पा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किरण आप्पा भोसले यांचे व्यक्तिमत्व म्हणजे "बोलणं कमी आणि काम जास्त." बोलण्यापेक्षा कामावर जास्त लक्ष केंद्रित करणारे असे हे व्यक्तिमत्व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पंढरपूर शहरातील भव्य असे श्री विठ्ठल हॉस्पिटल हे कित्येक वर्ष काही कारणास्तव बंद स्थितीत होते, असे हे भव्य हॉस्पिटल सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे असे हे किरण आप्पा भोसले श्री विठ्ठल हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये किरण आप्पा भोसले यांचा मोठा हातभार लागलेला आहे. पंढरपूर शहरातील तसेच पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सभासद सर्वसामान्य जनता कामगार यांच्या आरोग्याचे जपणूक करण्याचे उद्देशाने कै. औदुंबर आण्णा पाटील यांनी सुरू केलेले हे श्री विठ्ठल हॉस्पिटल हे कित्येक वर्ष बंद स्थितीत होते. सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करीत किरण आप्पा भोसले तसेच त्यांचे सहकारी मित्र यांनी हे श्री विठ्ठल हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच पंढरपूर येथील उप रुग्णालय या ठिकाणी देखील तेथील आरोग्य समितीवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाला व समाजातील सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ते सदैव सक्रिय असतात. त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या नेतृत्वाखाली व पंढरपूर शहरातील मराठा समाजातील मान्यवर नेते कार्यकर्ते यांच्या योगदानामधून छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक पंढरपूर शहरात व्हावे म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश देखील आलेले आहे. मराठा समाजासाठी मराठा भवन साठी गजानन महाराजांच्या पिछाडीस एक एकर अशी जागा मराठा समाजाला मिळवून देण्यामध्ये त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. हे सर्वसामान्य मराठा समाज व पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य लोक जाणतात. मराठा समाजातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे असे किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्नल भोसले चौक या ठिकाणी किरण आप्पा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी आज रोजी दिली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा