"मच गया शोर माढा नगरी मे" विधानसभेच्या निवडणूकीची हंडी मीच फोडणार.... अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा इथून आपली उमेदवारी असणार असून या माढा विधानसभेच्या निवडणुकीची हंडी आपणच फोडणार. असे वक्तव्य त्यांनी माढा येथील दही हंडी उत्सव निमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व मदतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याच्या उद्देशाने व शेतकऱ्यांना बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्याच्या तयारीने त्या माढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून उभे राहणार आहोत. असे त्यांनी माढा तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने व असे कार्यक्रम आयोजित करून माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कामध्ये राहण्याचे त्यांनी ठरवले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे पुढे बोलताना आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपण येणारी 2024 ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे सांगितले. अभिजीत पाटील यांच्या या वक्तव्याने माढा तालुक्यातील राजकारणी मंडळींना घाम फोडण्याचे काम अभिजीत पाटील यांनी केल्याचे चित्र सद्यस्थितीला दिसून येत आहे.
अभिजीत पाटील यांनी गावोगावी प्रचार यंत्रणा माढा तालुक्यामधून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजीत पाटील आणि जनसंपर्क वाढवण्यास जोर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. काही दिवसापूर्वी टेंभुर्णी येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्यात निवडणुकीच्या मैदानात कोणी असू द्या त्याला चित्रपट केल्याशिवाय राहणार नाही. असे देखील त्यांनी वक्तव्य केले होते. माढा येथील आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये माढा युवाशक्तीच्या माध्यमातून झालेल्या दहीहंडीचा शिवशाही प्रतिष्ठान माढा यांनी बक्षीस पटकावत मानाचा फेटा आणि रोख रक्कम तसेच पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील एडवोकेट धनंजय चव्हाण शंभू साठी पंडित साळुंखे यु एफ जानराव एडवोकेट विजय माने निशांत पालकर भाऊसाहेब महाडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तंबिले संजय तंबिले ज्ञानेश्वर बगडे संजय भोगे शिवाजी मुळे नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर दादा नाईक समाधान पाटील शंभू चौरे अमोल देशमुख आधी अन्य कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक आबासाहेब साठे, जमदाडे ,अक्षय शिंदे व अभिजीत आबा पाटील मित्र मंडळ परिवार माढा तालुका यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा