" प्रशांत परिचारक यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाने विधानसभेत जायला हवं"
पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस गोकुळ अष्टमीला असून त्यानिमित्ताने प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण शहरभर दिसू लागली आहे.
प्रशांतराव परिचारक यांच्यावर प्रेम करणारे तसेच पांडुरंग परिवार वर विश्वास व श्रद्धा असणारे असंख्य कार्यकर्ते प्रशांत परिचारक यांच्या सोबतीला आहेत. प्रशांत परिचारक यांचा प्रशासकीय यंत्रणेवर तसेच शासकीय विविध योजना याचा सखोल अभ्यास असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रशांत परिचारक हे युवा नेतृत्व सोलापूर जिल्ह्याला लाभलेले आहेत. अशा या युवा नेतृत्वाच्या अभ्यासूपणाला व विकास कामे शासन दरबारी पाठपुरावा करून ती विकास कामे पूर्णत्वास घेण्याची धमक असलेले हे युवा नेतृत्व आज महाराष्ट्राच्या विधानसभेत असायला हवे. अशी इच्छा व अपेक्षा प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य शेतकरी ऊस उत्पादक सभासद व्यक्त करताना सर्वत्र दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे विनंतीला त्यांनी मान देऊन येत्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी जाहीर करावी. कुठल्याही पक्षाच्या वळचळणीला न जाता प्रशांत परिचारक व पांडुरंग परिवार यांनी स्वतंत्र अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवली ,तरी परिचारक कुटुंबावर प्रेम करणारे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी बांधव त्यांच्या पाठीशी आहे. याची खात्री गत विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून निवडून आणण्याचे मोलाचे योगदान प्रशांत परिचारक व त्यांचा पांडुरंग परिवारांनी दिलेले आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.
प्रशांतराव परिचारक यांनी पुन्हा एकदा जोमाने गाव भेटी दौरा, घोंगडी बैठक अशा लोकसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी आपला संपर्क वाढवावा अशी अपेक्षा कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदार बंधू करू लागलेल्या चे चर्चा सर्वत्र दिसून येत आहे. प्रशांतराव परिचारक यांना व पांडुरंग परिवाराला त्याचप्रमाणे कै. सुधाकरपंत परिचारक यांना मानणारा वर्ग अद्यापही सक्रिय आहे. पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून परिचारक कुटुंबावर प्रेम करणारा विशेष असा वर्ग हा अद्यापही परिचारक यांच्या पाठीशी आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या साडेतीन लाखाच्या जवळपास आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर शहर व पंढरपूर मतदार संघातील ग्रामीण भागातील काही गावे ही अद्यापही परिचारक कुटुंबांना मानणारा असा हा मतदार असून या मतदारांच्या भरवशावर त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्य जनता ही स्थानिक नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व कोणीतरी हवे म्हणून या अपेक्षेणी तो मतदार वाट पाहतो आहे. मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन साखर कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी गेली कित्येक वर्ष परिचारक कुटुंब कार्यरत आहे. याची जाणीव मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी वर्ग यांना आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमधून उद्याच्या विधानसभेला तिरंगी किंवा चौरंगी अशी निवडणूक होण्याची शक्यता असल्यामुळे या लढती मधून परिचारक हे आपल्या विश्वासू कार्यकर्ते व मतदारांच्या भरोशावर हे सहजपणे निवडून येऊ शकतात. आता फक्त प्रशांतराव परिसरात यांनी या येत्या विधानसभेसाठी कंबर कसायला हवी व जोमाने गाव भेटीदौरे लोकांची कामे त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवायला हवेत. प्रशांतराव परिसर त्यांनी आपल्या गोकुळ अष्टमीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपला जनसंपर्क हा वाढवावा व विधानसभेसाठी त्यांनी तयारी करावी. अशी अपेक्षा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादक सभासद कष्टकरी काम करी तरुण वर्ग महिला माता भगिनी या व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा