"प्रशांत परिचारक यांनी येत्या विधानसभेसाठी कंबर कसायला हवी"


 पंढरपूर ( राजेंद्र काळे) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भावी आमदारकी ची माळ आपल्या गळ्यामध्ये घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत परिचारक यांनी प्रयत्न करायला हरकत नाही.

     मागील काही वर्षांचा कालावधी सोडला तर पंढरपूर मतदार संघावर परिचारक कुटुंबाचे वर्चस्व पूर्वी देखील होते, तसेच आज देखील त्यांचे वर्चस्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये दिसून येते. त्यांच्या ताब्यात असलेले सहकारी संस्था, बँक, साखर कारखाने आदी लोक उपयोगी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य त्याने आबादित ठेवलेले आहे. या कार्याच्या जोरावर त्यांनी काही वर्षांपूर्वी कै. माजी आमदार भारत भालके यांच्या विरोधात आपली विधानसभेची उमेदवारी भरून तोडीस तोड अशी टक्कर दिलेली होती. त्यावेळी प्रशांत परिचारक यांना मिळालेले मतदान हे दुर्लक्ष करण्यासारखे तर नाहीच नाही. परिचारकांनी आपला गट, परिवार अद्यापही आपल्याकडे राखून ठेवल्यामुळे त्यांचे वर्चस्व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांवर असल्यामुळे परिचारक कुटुंबांना मानणारा वर्ग हा मोठा आहे.

    ‌ कै. भालके यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट निर्माण झालेली असताना त्यावेळी सध्याचे आमदार समाधान आवताडे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी परिचारकांनी मोठ्या मनाने आपली उमेदवारी मागे घेऊन समाधान आवताडे यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचे त्यांनी ठरवले. आणि ते यशस्वी करून दाखवले. समाधान आवताडे यांना पंढरपूर शहर परिसरामध्ये तरी अद्यापही जम बसवता आलेले नाही. हे सध्या तरी दिसून येते. हे सत्य नाकारता येत नाही.भाजपाची उमेदवारी लाभल्यानंतर अवताडे यांनी सुरुवातीचा काही काळ कामाचा अंदाज घेत घेत विकास कामे ची सुरुवात हळूहळू करण्यात आली या कामाला प्रशांत परिचारक यांनी सहकार्य केल्यामुळे विविध विकासकामे ही प्रगतीपथावर राहिली. हे विसरून चालणार नाही.

      परिचारक गटाचे पंढरपूर शहरावर वर्चस्व असून पंढरपूर मतदार संघामध्ये लाख ते दीड लाख मतदारांची संख्या असल्यामुळे या भागाकडे जर त्यांनी पुन्हा एकदा असे लक्ष दिल्यास हे मतदान त्यांच्या पारड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागामध्ये त्यांचं वर्चस्व अद्यापही असल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना देखील वाटते, की प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहून या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची सेवा करावी. कै. सुधाकर पंत परिचारक यांचा एकनिष्ठ गट अद्यापही सक्रिय असल्यामुळे तो परिचारक कुटुंबांना मानणारा आहे.

    येणारी 2024 ची विधानसभा निवडणूक ही चौरंगी होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशांत परिचारक यांनी आपले वेगळे अस्तित्व दाखवले तर ते आपल्या पारंपारिक मतदानाच्या जीवावर ते सहजपणे निवडून येऊ शकतात. परिचारक कुटुंबांना आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये भरपूर प्रमाणात मतदान हे झालेले आहे.परिचारक गटाची निवडणूक यंत्रणा ही अन्य उमेदवारांच्या पेक्षा कित्येक पटीने सरस आहे.त्यांना त्यांचे हक्काचे 65 ते 70 हजार मतदान हे कायमस्वरूपी त्यांना मिळत असल्याचे दिसून येते. येणाऱ्या विधानसभा मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन व कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे देखील निवडणुकीचा रिंगणामध्ये उतरणार असून, सध्याचे आमदार समाधान आवताडे हे देखील पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहेत. या तिघांच्या उमेदवारी मधून मत विभाजन हे होणार आहे.या मत विभाजनाचा लाभ परिचारक गटाला होऊ शकतो.प्रशांत परिचारक यांनी जर स्वतंत्र अपक्ष म्हणून जर का निवडणूक लढवली तर त्यांचे हक्काचे मतदान त्यांना मिळणार आहे. या हक्काच्या 70 ते 80 हजार मतदारांच्या मतदानावर ते सहजपणे विधानसभेला निवडून येऊ शकतात. असा अंदाज परिचारक प्रेमी गटामध्ये सध्या सुरू आहे.

      प्रशांत परिचारक यांनी भाजपाच्या दबावाला थोडेसे झुगारून जर त्यांनी उमेदवारी आपली जाहीर केली. तर त्यांना यश मिळू शकते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे कोणतेही सरकार राज्यामध्ये स्थापन होईल. त्यावेळी प्रशांतराव परिचारक यांच्या अपक्ष उमेदवारीला खूपच महत्त्व आलेले असेल.

      म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता आता प्रशांत परिचारक यांना उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कंबर कसायला सांगत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....