"मी भावी आमदार नव्हे,तर मी केलेल्या कामा मुळेच आमदार होणार आहे"... मनसे नेते दिलीप बापू धोत्रे.
पंढरपूर ( प्रतिनिधी) . गेली 33 वर्ष मी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच मनसे नेते राज ठाकरे साहेबांनी मला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा साठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मी केलेल्या कामाची जाणीव आहे. मी आज पर्यंत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी त्याचप्रमाणे तरुण युवक, महिला माता भगिनी यांच्या मदतीला मी धावून गेलो आहे. मतदार संघातील असंख्य कामे मी केलेली आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये मी केलेल्या कार्याची आठवण अद्यापि लोकांना आहे. तसेच पंढरपूर शहरांमध्ये नगरपालिकेचे रस्ते त्यांची झालेली दुरावस्था व त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी स्वखर्चाने हे रस्त्याचे खड्डे बुजवलेले आहेत. हे सर्व पंढरपूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे.
मनसे या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 250 जागा या विधानसभेसाठी आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्र राज्याला एक सक्षम सरकार देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, महिला वर्ग यांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आम्ही केलेल्या कामाची पोच पावती महाराष्ट्रातील जनता ही दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य जनता महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही युती व आघाडीला कंटाळलेली आहे. याला पर्याय म्हणून मनसे हा एकमेव पक्ष सध्या आघाडीवर आहे. आमच्या मनसे या पक्षाला महाराष्ट्रातून सर्वत्र जनतेमधून पाठिंबा मिळत आहे.
भावी आमदार असे माझ्या कुठल्याही डिजिटल बोर्डावर उल्लेख आम्ही केलेला नाही. मी भावी आमदार नव्हे तर मी केलेल्या कामाच्या माध्यमातून जनताच मला आमदार करणार आहे. असे आज मनसेचे नेते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा