"मुलींनो.... तुमची कोणी छेड काढत असेल तर पोलीस दीदी व पोलीस काकाला फोन करा"... पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर
पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या महाराष्ट्र मधील काही शहरांमधून मुलींच्या वर होणारे लैंगिक अत्याचार तसेच विनयभंग आणि छेडछाड अशा गोष्टी घडत आहेत. तरी शाळा व महाविद्यालयीन मुलींसाठी पोलीस दलाच्या वतीने मुलींच्या मदतीसाठी व छेडछाड रोखण्यासाठी पोलीस दलाने पोलीस काका व पोलीस दीदी यांची नेमणूक प्रत्येक शाळेच्या ठिकाणी केलेले असून अशा काही छेडछाडीच्या व विनयभंगाच्या घटना शाळेबाहेरील भागामध्ये घडत असतील किंवा अन्य ठिकाणी घडत असतील तर मुलींनी पोलीस काका व दीदीला फोन करून त्याची कल्पना द्यावी. पोलीस काका व पोलीस दीदी आपल्या संरक्षणासाठी लगेच हजर होतील. मुलींनो तुम्ही भिऊ नका तुमची कोणी छेड काढत असेल तर पोलीस काका व पोलीस दीदीला फोन लावा. असे आवाहन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी वाय मुजावर यांनी आज पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, तारापूर लोटस हायस्कूल, सिताराम महाराज हायस्कूल, तसेच जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन तेथील मुलींना धीर देण्याचे व पोलीस काका व पोलीस दीदी आपल्या पाठीशी आहेत असे धीर देणारे वक्तव्य पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांनी केले.
प्रत्येक शाळेच्या बाहेर पोलीस काका व पोलीस दीदी यांचे फोटो व त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. अशा काही छेडछाडीच्या व अन्य काही घटना घडत असतील तर पोलिसांना त्वरित कळवावे. असे आव्हान देखील पोलीस निरीक्षण किंवा मुजावर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा