"चंद्रभागा नदीतील सर्व मंदिरे पाण्याने वेढले" भीमा नदीला पूरस्थिती
पंढरपूर ( प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची दमदार हजेरी होत असल्यामुळे पुणे परिसरातील सर्व धरणे ही भरली गेलेली आहेत.
या धरणातील पाणी उजनी धरणामध्ये येत असून उजनी धरण देखील आज रोजी शंभर टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उजनी धरणातील पाणी हे भीमेचे पात्रेमध्ये सोडले जात असून या सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
चंद्रभागा नदीतील वाळवंटा मधील सर्व मंदिरे ही पाण्याने वेढली गेलेली आहेत.
नदीपात्रामध्ये पाण्याचा वाढता प्रवाह पाहून नदीकाठच्या रहिवासी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना या दिल्या गेलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजून वाढला तर पंढरपूर शहरांमध्ये पूर परिस्थिती येऊ शकते अशी लक्षणे सद्यस्थितीला दिसून येत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा