"राजे लोकांच्या नंतर वारसा परंपरा आमदार, खासदार यांच्या मुलांची सुरु आहे "
पंढरपूर ( प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्या पंचवार्षिक निवडणूक चे वारे वाहू लागले आहे.विविध पक्षाच्या नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरून आपल्या पदरात विधानसभेची उमेदवारी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुढारी मंडळी स्वतः ला किंवा आपल्या मुलाला, पुतण्या,भाचा,मुलगी अशा जवळच्या नातलगांना पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपड सुरू झाली आहे.ही धडपड पाहून सर्वसामान्य जनतेला पूर्वीच्या राजे महाराजे यांच्या वंशपरंपरागत आलेली सत्ता व अधिकार यांची आठवण येते.एकाद्या राजाच्या निधनानंतर त्यांचे वंशज गादीवर बसविले जात होते.आताच्या काळामध्ये आमदार, खासदार असलेल्या व्यक्तीला आपल्या नंतर आपला मुलगा मुलगी ही आमदार खासदार झाला पाहिजे व सत्ता ही ताब्यात राहिली पाहिजे असे धोरण या राजकिय नेते ची असते व आहे.
राजे महाराजे यांच्या नंतर आता हेच आमदार खासदार हे त्या त्या मतदारसंघातील राजे,महाराजे झाले आहेत.आपल्या कुटुंबातील सदस्य सोडून अन्य कोणी आमदार खासदार होता कामा नये ही भूमिका कायम जप्त आलेली आहे.सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आमदार खासदार या पदावर जाण्यासाठी हे पुढारी प्रयत्न करीत नाहीत.कार्यकर्तेनी कायम आपला झेंडा खांद्यावर घेतला पाहिजे व तो मिरवला पाहिजे, कार्यकर्ते नी रामा गाड्यांची भूमिका घेतली पाहिजे.कार्यकर्तेनी सतरंज्या उचल्या पाहिजे.व या कार्यकर्त्यांनी या पुढाऱ्यांच्या पुढेपुढे केले पाहिजे अशी अपेक्षा या प्रस्थापित राजकारणी पुढाज्यांची असते.
या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात जाणाऱ्या लोकांची अडवणूक, दमबाजी, दबाव तंत्राचा वापर करून जेरीला आणले जाते.व आपले वर्चस्व प्रस्थापित केले जाते.अशा सर्व गोष्टींचा विचार करता या प्रस्थापित राजकारण्यांना शह देण्यासाठी आता कार्यकर्ते नी जागृत झाले पाहिजे.एकाच घराण्यातील व्यक्तीला आमदार खासदार ही पदे कशासाठी हवी आहेत.असा खडा सवाल केला जायला हवा.
महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यातील तालुके मधून अशा राजकीय पदावर हीच सरंजामी थाट पाहायला मिळतो आहे.सर्वसामान्य जनता या घराणेशाही ला कंटाळलेली आहे.नवीन नेतृत्व, नवीन चेहरा आता लोकांना हवा आहे.याची जाणीव सर्व पक्षीय नेतेमंडळींना व्हायला हवी.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांनी बोलून दाखवले की या पुढे लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.शरद पवार यांनी योग्य विचार मांडले आहेत.नवीन तरुणांना राजकीय संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यांना देखील सत्तेत यायची संधी मिळाली पाहिजे.हे धोरण योग्य वाटते.अन्यथा सद्यस्थितीत हीच सरंजामी थाट मिरवणारी मंडळी पुन्हा या जनतेवर राज्य करीत राहतील.
सर्वसामान्य जनतेला आता नेतृत्व हे नवे हवे आहे.निष्कलंक, प्रामाणिक,आणि विकासाभिमुख नेतृत्व हवे आहे.आता या पुढे या राजकिय राजे,महाराजे यांची सरंजामी पद्धत बंद व्हायला हवी.अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करीत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा